“आता तुझ्यासोबत म्हातारा व्हायचंय…”, Arbaaz Khan ची पत्नी शूरासाठी खास पोस्ट

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Arbaaz Khan | अरबाज खानने अलीकडेच दुसऱ्यांदा विवाहगाठ बांधली. वयाच्या 56 व्या वर्षी पुन्हा बोहल्यावर चढलेल्या अरबाज खानने त्याची दुसरी पत्नी शूरा खानसाठी एक खास पोस्ट केली आहे. शूरा खानने गुरूवारी तिचा वाढदिवस साजरा केला. लग्नानंतर शूराचा हा पहिला वाढदिवस आहे. या खास दिवशी अरबाजने खास चारोळ्या लिहित पत्नीला शुभेच्छा दिल्या. शूराच्या वाढदिवसानिमित्त त्याने एक फोटो शेअर केला असून भावना व्यक्त केल्या आहेत.

गुरूवारी अरबाज खानची पत्नी शूरा खानचा वाढदिवस होता. अरबाजने आपल्या पोस्टने तिचा दिवस खूप खास बनवला. पत्नी शूराने देखील पतीच्या पोस्टवर प्रतिक्रिया दिली आहे. अरबाजची पत्नी शूरा खानने 18 जानेवारीला तिचा 31 वा वाढदिवस साजरा केला. ती पती अरबाजपेक्षा खूप वर्षांनी लहान आहे.

शूराचा वाढदिवस अन् अरबाजची खास पोस्ट

अरबाजने शूरासोबतच्या रोमँटिक फोटोसह एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे. अरबाजने कॅप्शनमध्ये लिहिले, “माझ्या प्रिय शूरा, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा… तुझ्याइतके मला कोणीही हसवत नाही. मला तुझ्यासोबत मोठे व्हायचे आहे. अरेरे… मोठा नाही म्हातारा खूप म्हातारा… जेव्हा या विश्वाने आम्हाला एकत्र आणले, तेव्हा माझ्या बाबतीत घडणारी प्रत्येक गोष्ट चांगली होती.”

तसेच जेव्हा मी पहिल्यांदा तुझ्यासोबत डेटवर गेलो होतो, तेव्हा मला लगेच कळले होते की मी माझे संपूर्ण आयुष्य तुझ्यासोबत घालवणार आहे. तू नेहमी तुझ्या सौंदर्याने आणि दयाळूपणाने मला भुरळ घालतेस. मला हे रोज आठवते जेव्हा मी तुझ्यासाठी ‘कबूल है’ म्हटलो होतो. हे शब्द माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम शब्द होते जे मी तुझ्यासाठी उच्चारले होते. आय लव्ह यू, असेही अरबाजने पोस्टच्या माध्यमातून म्हटले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Arbaaz Khan (@arbaazkhanofficial)

 

Arbaaz Khan ची पत्नी शूरासाठी खास पोस्ट

अरबाज खानच्या या पोस्टवर शूराने प्रतिक्रिया दिली आहे. तिने हार्ट्स इमोजीसह अरबाज लिहिले आहे. अभिनेत्याच्या या पोस्टवर सोशल मीडिया यूजर्सही भरपूर कमेंट करत आहेत. काहींनी अरबाजवर कमेंटच्या माध्यमातून निशाणा साधला तर काही जण शूराला शुभेच्छा देताना दिसले.

दरम्यान, 56 वर्षीय अरबाजने मागील वर्षी 24 डिसेंबर रोजी शूरासोबत लग्न केले. दोघांचे हे लग्न अरबाज खानची बहीण अर्पिता खानच्या घरी पार पडले. शूरा पेशाने मेकअप आर्टिस्ट आहे. रवीना टंडन, रितेश देशमुख, जेनेलिया डिसूझा, फराह खान, साजिद खान यांच्यासह अनेक बी-टाऊन स्टार्सनी या लग्नाला हजेरी लावली होती.

News Title- Arbaaz Khan posted a special post on wife Shura’s birthday
महत्त्वाच्या बातम्या –

जगातील सर्वात श्रीमंत देशात Beer मिळणार नाही! विक्री थांबणार, जाणून घ्या कारण

Government | मुलाला कोंचिगला टाकताय? 16 वर्ष पूर्ण आहेत ना? वाचा सरकारची नवी नियमावली

Sachin Tendulkar चा 50 व्या वर्षीही जलवा ‘कायम’, इरफान पठाणचा ‘विजयी’ षटकार

Ram Mandir प्राणप्रतिष्ठेपूर्वी सरकारचे केंद्रीय कर्मचाऱ्यांना खास गिफ्ट, घेतला मोठा निर्णय

Vidya balan | अभिनेत्री विद्या बालनच्या घरी पाळणा हालणार?, सर्वात मोठी माहिती झाली उघड