जगातील सर्वात श्रीमंत देशात Beer मिळणार नाही! विक्री थांबणार, जाणून घ्या कारण

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Beer । जागतिक पातळीवर सर्वच बाबींमध्ये वर्चस्व असलेला देश म्हणजे अमेरिका. जगातील सर्वात विकसित देश असलेल्या अमेरिकेत मार्च महिन्यात बिअरचा तुटवडा (Beer Shortage) जाणवण्याची दाट शक्यता आहे. माहितीनुसार, बीअर उत्पादक कंपनी Anheuser-Busch च्या 5,000 कर्मचाऱ्यांनी मार्चमध्ये संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. पगारवाढ, नोकरीची सुरक्षा आणि इतर सुविधांशी संबंधित कर्मचारी संपाचे हत्यार उपसणार आहेत.

त्यामुळे या प्रकरणावर तोडगा न निघाल्यास मद्यनिर्मिती करणाऱ्या कंपनीच्या संपामुळे बिअर उत्पादन ठप्प होऊ शकते. अमेरिकेमधील 12 Anheuser-Busch ब्रुअरीजमधील कामगारांचे प्रतिनिधित्व टीमस्टर्स लेबर युनियनद्वारे केले जाते. मागील महिन्यात झालेल्या मतदानात संपाच्या बाजूने 99 टक्के मतदान झाले होते.

कामगार आंदोलनाच्या वाटेवर

कंपनीसोबतचा सध्याचा करार 29 फेब्रुवारी रोजी संपणार आहे. त्यामुळे आंदोलन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. टीमस्टर्स लेबर युनियनद्वारे सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे की, 29 फेब्रुवारीपर्यंत कोणताही करार न झाल्यास मार्चमध्ये कोणत्याही बिअरचे उत्पादन होणार नाही.

Beer उत्पादन थांबवण्याचा इशारा

टीमस्टर्सचे अध्यक्ष सीन ओब्रायन म्हणाले की, जर कामगारांचा आदर करणार्‍या कराराची वाटाघाटी करण्यासाठी Anheuser-Busch कंपनीचे अधिकारी एकत्र येऊ शकत नाहीत, तर आम्ही त्यांना रस्त्यावर आणल्याशिवाय शांत बसणार नाही. कामगारांच्या युनियनचे म्हणणे आहे की, मागील नोव्हेंबरमध्ये नोकरीच्या सुरक्षेबाबत वाटाघाटी करण्यास नकार दिल्यानंतर कंपनीच्या नेतृत्वाने कामगारांची भेट घेतली नाही.

जॅक्सनव्हिल फ्लोरिडा येथील एनह्युसर-बुश ब्रुअरीच्या एका कर्मचाऱ्याने ‘द इंडिपेंडंट’शी बोलताना सांगितले की, जरी 25 वर्षांपूर्वी वेतन चांगले असले तरी ते महागाई आणि इतर आर्थिक घटकांशी ताळमेळ राखण्यात अयशस्वी ठरत आहे. त्यामुळे पगारवाढ गरजेची आहे.

तसेच जेव्हा मी इथे काम करायला सुरूवात केली तेव्हा ही एक मोठी कंपनी मानली जात होती. इथला पगार खूप चांगला होता, पण महागाईमुळे ही जास्त पगाराची नोकरी नाही, असेही कर्मचाऱ्याने सांगितले. तसेच माझा भाऊ पाच वर्षांपूर्वी Anheuser-Busch कंपनीत नोकरीला लागला पण 25 वर्षांपूर्वी सहज कव्हर केलेले खर्च भरून काढण्यासाठी आता मात्र धडपड करावी लागत आहे, अशा वेदना कामगारांच्या आहेत.

News Title- world’s richest country will not have beer due to labor strikes
महत्त्वाच्या बातम्या –

Government | मुलाला कोंचिगला टाकताय? 16 वर्ष पूर्ण आहेत ना? वाचा सरकारची नवी नियमावली

Sachin Tendulkar चा 50 व्या वर्षीही जलवा ‘कायम’, इरफान पठाणचा ‘विजयी’ षटकार

Ram Mandir प्राणप्रतिष्ठेपूर्वी सरकारचे केंद्रीय कर्मचाऱ्यांना खास गिफ्ट, घेतला मोठा निर्णय

Vidya balan | अभिनेत्री विद्या बालनच्या घरी पाळणा हालणार?, सर्वात मोठी माहिती झाली उघड

Flu and Chest Congestion | कफ आणि खोकल्याला त्वरित आराम देईल ‘हा’ आयुर्वेदिक काढा; जाणून घ्या बनवण्याची पद्धत