Ram Mandir Live Telecast l 22 जानेवारीला घरबसल्या पाहू शकता राम मंदिर सोहळ्याचे थेट प्रक्षेपण

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ram Mandir Live Telecast l संपूर्ण भारतीयांना 22 जानेवारीला होणाऱ्या अयोध्येतील राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याची उत्सुकता लागली आहे. या दिवशी रामल्लाचे दिमाखदार लोकार्पण सोहळा डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी जगभरातील अनेक राम भक्त आतुर आहेत. तर या सोहळ्यासाठी उत्तर प्रदेश सरकारकडून जोरदार तयारी देखील सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे. परंतु या दिवशी कोणत्याही राम भक्तांनी अयोध्येत येऊ नई असे थेट आवाहन पंतप्रधान मोदी (Ram Mandir Live Telecast) यांनी देशवासियांना केले आहे.

घरबसल्या प्रभु रामाचे दर्शन घेऊ शकता :

मात्र पंतप्रधानाच्या या आवाहनानंतर अनेक देशवासियांना असा प्रश्न पडला आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत प्राणप्रतिष्ठा सोहळा नेमका कसा होणार? या सोहळ्यात नेमके कोणते पाहूणे येणार आहेत? पूजा कशी होणार, मंदिराची वैशिष्ट्ये काय आहेत यासोबत अनेक प्रश्नावर चर्चा सुरु आहे.

मात्र अशा परिस्थितीत तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. कारण आता राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचा प्रत्येक क्षण तुम्ही आता घरबसल्या पाहू शकता. होय हे खरे आहे तुम्ही अयोध्येला जाणार नसेल तरीही घरी बसून तुम्ही प्रभु रामाचे (Ram Mandir Live Telecast) दर्शन घेऊ शकता. कसे ते जाणून घ्या…

Ram Mandir Live Telecast l कुठे पाहता येणार हा दिमाखदार सोहळा? :

केंद्रातील मोदी सरकारच्या सुचनेनुसार, 22 जानेवारीच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमामध्ये देशभरातील लोकांपर्यंत पोहण्यासाठी दुरदर्शनद्वारे खास व्यवस्था केली जाणार आहे. अयोध्येतील नवनिर्मित राम मंदिरातून सकाळी 11 ते दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास संपूर्ण धार्मिक सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

अशातच दुरदर्शन अयोध्येत राम मंदीर आणि आसपास तब्बल 40 हुन अधिक कॅमरे लावणार आहे. एवढेच नव्हे तर 4k डिस्प्लेवर या सोहळ्याचे थेट प्रसारण (Ram Mandir Live Telecast) केले जाणार आहे. सोबतच डीडी नॅशनल आणि डीडी न्युजवर याचे थेट प्रसारण होणार असल्याचे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान, मंदिर ट्रस्टने दिलेल्या माहितीनुसार या भव्य दिव्य सोहळ्यासाठी जगभरातून सुमारे आठ हजार हुन अधिक पाहुण्यांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. यापैकी महाराष्ट्रातून साधारण 900 जणांना आमंत्रण देण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे.

News Title : Ram Mandir Live Telecast

महत्त्वाच्या बातम्या  –

Rivaba Jadeja | जड्डूच्या घरात राजकीय कलह; राम मंदिरावरून वहिणी-नणंद भिडल्या!

Phone Overheating l तुमचा मोबाईल वारंवार गरम होतोय तर या गोष्टी टाळा

Ram Mandir | …म्हणूनच कारसेवकांवर गोळ्या झाडल्या; मुलायम यांच्या लहान भावानं सांगितलं कारण

“आता तुझ्यासोबत म्हातारा व्हायचंय…”, Arbaaz Khan ची पत्नी शूरासाठी खास पोस्ट

जगातील सर्वात श्रीमंत देशात Beer मिळणार नाही! विक्री थांबणार, जाणून घ्या कारण