Ram Mandir साठी महिन्याला 2 कोटी रुपयांची देणगी; ट्रस्टने मागवल्या ‘या’ गोष्टी

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ram Mandir । अवघ्या जगाचं लक्ष लागलेल्या राम मंदिराच्या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी उलटी गिनती सुरू झाली आहे. येत्या सोमवारी अयोध्येत भव्य राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. दशकातील सर्वात मोठा कार्यक्रम म्हणून याकडे पाहिले जात आहे. कारण 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. भव्य उद्घाटन सोहळ्यापूर्वी भक्तांकडून रामललाला मोठ्या प्रमाणात देणगी अर्पण केली जात आहे.

माहितीनुसार, राम मंदिर ट्रस्टला दररोज तीन ते चार लाखांच्या देणग्या मिळत आहेत. हा आकडा महिन्याला कोटीच्या घरात आहे. राम मंदिर ट्रस्टला दरमहा सुमारे 1.5 ते 2 कोटी रुपये मिळत आहेत. यासाठी ट्रस्टने आता पैसे मोजण्याची मशीन मागवली आहे. रक्कम वाढत असल्याने पैसे मोजण्याच्या मशीन ट्रस्टने खरेदी केल्या आहेत. याचे कारण म्हणजे राम मंदिर अभिषेक सोहळ्यासाठी येणारी मोठी देणगी.

महिन्याला 2 कोटी रुपयांची देणगी

अयोध्या येथील श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट कार्यालयाचे प्रभारी प्रकाश गुप्ता म्हणाले की, आधी प्रत्येक महिन्याच्या पाचव्या आणि विसाव्या दिवशी प्रसादाच्या इथे ठेवलेल्या पैशांची मोजणी केली जात होती. आता हे काम दररोज केले जात आहे. ट्रस्टने रोख मोजणी यंत्रांचा अर्थात पैसे मोजण्याच्या मशीनचा वापर सुरू केला आहे.

राम मंदिरासाठी विविध माध्यमातून देणगी मिळत आहे. चेक आणि रोख रकमेसह ऑनलाइनही देणगी दिली जात आहे. भक्तांकडून दररोज वेगवेगळ्या प्रकारे देणगी मिळाल्याने महिन्याचा आकडा कोट्यवधीच्या घरात आहे. इतर मार्गांनी गोळा केलेली देणगी दररोज अंदाजे 2 लाख रुपये जमते. नवी दिल्ली येथील ट्रस्टच्या बँक खात्यात NRI द्वारे देखील देणग्या मिळत आहेत.

Ram Mandir ट्रस्टने दिली माहिती

राम मंदिरातील बांधकामाची जबाबदारी असलेले श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट 22 जानेवारी रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या सर्व तयारींवर देखरेख करत आहे. ट्रस्टच्या 44 दिवसांच्या देशव्यापी निधी संकलन मोहिमेतूनही मोठ्या प्रमाणात देणगी गोळा झाली. श्री रामजन्मभूमी राम मंदिर निधी समर्पण अभियान 15 जानेवारी 2021 रोजी सुरू करण्यात आले.

दरम्यान, देशाच्या भव्य सोहळ्यासाठी जगभरातून भाविक योगदान देत आहेत. यामुळे मागील तीन वर्षांत मंदिर ट्रस्टला मिळालेल्या देणग्या अंदाजे 5,000 कोटी रुपयांवर पोहोचल्या आहेत. मिळालेली रक्कम ट्रस्टच्या बँक खात्यात जमा केली जाते.

News Title- Ram Mandir is getting Rs 2 crore donation per month
महत्त्वाच्या बातम्या –

Ram Mandir Live Telecast l 22 जानेवारीला घरबसल्या पाहू शकता राम मंदिर सोहळ्याचे थेट प्रक्षेपण

Rivaba Jadeja | जड्डूच्या घरात राजकीय कलह; राम मंदिरावरून वहिणी-नणंद भिडल्या!

Phone Overheating l तुमचा मोबाईल वारंवार गरम होतोय तर या गोष्टी टाळा

Ram Mandir | …म्हणूनच कारसेवकांवर गोळ्या झाडल्या; मुलायम यांच्या लहान भावानं सांगितलं कारण

“आता तुझ्यासोबत म्हातारा व्हायचंय…”, Arbaaz Khan ची पत्नी शूरासाठी खास पोस्ट