Pakistan Targeted Militant Targets In Iran l या देशाने केला पाकिस्तानवर हल्ला

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Pakistan Targeted Militant Targets In Iran l दहशतवादाला खतपाणी घालून पोसणाऱ्या पाकिस्तानात काल उशीरा इराणने एअर स्ट्राईक केला. इराणकडून करण्यात आलेल्या या हल्ल्यात बलुचिस्तानातील दहशतवादी संघटनेचा अड्डा उद्धवस्त करण्यात आला असून या हल्ल्यात दोन लहान मुलांचा मृत्यू झाल्याचे सांगत आज पाकिस्तानने इराणवर बदल्याची कारवाई केली आहे. (Pakistan Targeted Militant Targets In Iran) पाकिस्तानने इराणमधील दहशतवादी अड्ड्यांवर हवाई हल्ला केल्याचा दावा केला आहे. तसेच इराणच्या सीमेजवळ एका इराणी अधिकाऱ्याची हत्या करण्यात आले असल्याचा देखील दावा पाकने केला आहे. या घटनेमुळे दोन्ही देशांतील तणाव आता आणखी वाढला असल्याचे सांगण्यात आले आहे.

Pakistan Targeted Militant Targets In Iran l मात्र नेमके प्रकरण काय?

सर्वात अधिक इराणकडून पाकिस्तानच्या हद्दीतून होणाऱ्या दहशतवादी कारवायांचा बंदोबस्त करण्यासाठी थेट पाकिस्तानात घुसून सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला होता. यावेळी पाकिस्तानमधील (Pakistan Targeted Militant Targets In Iran) सर्वात मोठी दहशतवादी संघटना म्हणून ओळख असलेली जैश अल अदलचे अड्डे उद्धवस्त करण्यात आले.

या हल्ल्यांत अनेक दहशतवादी मारले गेल्याचा दावा इराणच्या सैन्याने केला आहे. दुसरीकडे या हल्ल्यांत अनेक निरपराध लोकांचा बळी गेल्याचा आरोप करत या हल्ल्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा पाकिस्तानने दिला होता.

24 तासांच्या आतमध्येच पाकिस्तानने इराणवर केला पलटवार (Pakistan Targeted Militant Targets In Iran) :

यानंतर 24 तासांच्या आतमध्येच पाकिस्तानने इराणवर पलटवार केला असल्याचे सांगण्यात आले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, इराणमधील आतंकवादी संघटना बीएलएच्या ठिकाणांना लक्ष्य करून हल्ले करण्यात आले. मात्र, पाकिस्तानकडून याबाबत अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

तर दुसरीकडे इराणची वृत्तसंस्था आयएएनएनुसार इराणच्या रिव्हॉल्यूशनरी गार्ड्सच्या एका अधिकाऱ्याची पाकिस्तान अफगाणिस्तानला लागून असलेल्या इराणच्या (Pakistan Targeted Militant Targets In Iran) अशांत परिसरात गोळी झाडून हत्या करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, एकीकडे मागील अनेक महिन्यांपासून इस्रायल-हमास संघर्षामुळे त्या दोन देशात तणाव वाढला असतानाच आता दुसरीकडे इराणनं पाकिस्तानवर केलेल्या एअरस्ट्राईकमुळे खळबळ माजली आहे.

News Title : Pakistan Targeted Militant Targets In Iran 

महत्त्वाच्या बातम्या –

Solapur Labor Colony Opening l आज हजारो कामगारांना मिळणार हक्काचं घर! देशातील सर्वात मोठ्या कामगार वसाहतीचे उदघाटन

Ram Mandir साठी महिन्याला 2 कोटी रुपयांची देणगी; ट्रस्टने मागवल्या ‘या’ गोष्टी

Ram Mandir Live Telecast l 22 जानेवारीला घरबसल्या पाहू शकता राम मंदिर सोहळ्याचे थेट प्रक्षेपण

Rivaba Jadeja | जड्डूच्या घरात राजकीय कलह; राम मंदिरावरून वहिणी-नणंद भिडल्या!

Phone Overheating l तुमचा मोबाईल वारंवार गरम होतोय तर या गोष्टी टाळा