मावळात अनुभव पडतोय कमी, नवख्या उमेदवारामुळे ठाकरे गटाची दमछाक!

Pimpri Chinchwad | लोकसभा निवडणूकीच्या प्रचाराने आता चांगलाच जोर पकडला आहे. मावळ लोकसभेत तर प्रचार शिगेला पोहोचल्याचे दिसत आहे. गावागावात, शहरातील गल्ली बोळात फिरून कार्यकर्ते आपल्या उमेदवाराचा प्रचार करण्यात गुंतल्याचे चित्र सध्या मावळात दिसतंय. यंदाच्या लोकसभेत राज्यातील ज्या काही प्रमुख लढती आहेत, त्यातील एक लढत ही मावळ लोकसभा मतदारसंघात होत आहे. याचे कारण या मतदारसंघात उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना थेट आमने-सामने आहेत. मावळ लोकसभेतील एकंदरीत वातावरण नेमकं कसं आहे, ह्यावर टाकलेला हा प्रकाश….

मावळ लोकसभा मतदारसंघात (Pimpri Chinchwad) शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय आणि मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार म्हणून श्रीरंग आप्पा बारणे (Shrirang Appa Barne) हे निवडणूक लढवत आहेत. श्रीरंग बारणे हे तिसऱ्यांदा धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. परंतू आता ते ज्या शिवसेनेचे उमेदवार आहेत, त्या पक्षाचे प्रमुख हे एकनाथ शिंदे आहेत. तर दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अर्थात महाविकास आघाडीकडून संजोग वाघेरे पाटील हे निवडणूकीच्या रिंगणात आहेत. मावळ लोकसभेत एकूण 33 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. असे असले तरीही खरी लढत ही श्रीरंग बारणे आणि संजोग वाघेरे पाटील यांच्यात होणार, असंच चित्र दिसत आहे.

Shrirang Barne 3

श्रीरंग बारणे यांना हॅट्रिकची संधी –

श्रीरंग बारणे उर्फ आप्पा बारणे (Shrirang Appa Barne) हे मावळ लोकसभेत मागील दोन टर्मचे खासदार आहेत. त्यांनी 2014, 2019 अशा सलग दोन टर्म मावळ लोकसभेचे मैदान मारले आहे. गेल्यावेळी तर त्यांनी खुद्द अजित पवार यांचे सुपूत्र पार्थ पवार यांचा पराभव केला होता. मावळ लोकसभेत असलेल्या सहाही मतदारसंघात शिवसेना पक्षाला जनाधार आहे, परंतू तो जनाधार खासदार निवडून आणेल इतका मोठा नाही. परंतू मागील दोन्ही वेळी भाजपा-शिवसेना युती असल्याने आणि लोकसभेला ही जागा शिवसेनेच्या कोट्यात असल्याने बारणे निवडून आले. परंतू आता बारणेंसाठी मैदान अजून सोपे झाले आहे. याचे कारण राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी महायुतीचे बारणे हे उमेदवार आहेत. तसेच, प्रथमच मावळ लोकसभेतील (Pimpri Chinchwad) सहाही विधानसभा मतदारसंघातील आमदार आप्पा बारणे यांच्या सोबत आहेत. त्यामुळे श्रीरंग बारणे यांना यावेळी हॅटट्रीकची चांगलीच संधी आहे.

Sanjog Waghere 2

नवख्या उमेदवारामुळे मविआची होतेय दमछाक –

श्रीरंग बारणे (Shrirang Appa Barne) यांच्या तुलनेत महाविकासआघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील हे मात्र नवखे आहेत. यापूर्वी त्यांनी फक्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक लढवली होती. पिंपरी-चिंचवड महानगराचे माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी शहराध्यक्ष हीच त्यांची आजवरची राजकीय कारकीर्द राहिलीये. फक्त लोकसभा निवडणूक लढवायची आणि एकदा खासदार व्हायचे, ही त्यांची प्रबळ इच्छा आणि याच इच्छेपोटी त्यांनी पक्षांतर केले. हक्काची जागा म्हणून शिवसेना ठाकरे गटाला मावळची (Pimpri Chinchwad) जागा मिळाली आणि उपलब्ध चेहऱ्यांमध्ये ‘भक्कम उमेदवार’ म्हणून वाघेरे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली. परंतू, लोकसभा निवडणूकीच्या रणांगणात अगदीच नवखे असलेल्या वाघेरे यांच्यामुळे ठाकरे गटाची पर्यायाने मविआची दमछाक होत आहे.

Shrirang Barne 4

उशीरा सुरुवात तरीही बारणेंची प्रचारात मुसंडी!

मावळ लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून संजोग वाघेरे यांचे नाव खुप अगोदर निश्चित झाले होते. त्यामुळे त्यांनी तशी प्रचारालाही खुप अगोदरच सुरुवात केली होती. गावभेट दौऱ्यातून त्यांनी मतदारसंघ पिंजून काढायला सुरुवात केली. त्यामानाने जागांच्या रस्सीखेचात मावळ लोकसभेच्या जागेवर महायुतीकडून खुप उशिरा उमेदवार जाहीर करण्यात आला. त्यातही महायुतीतील बहुंताश पक्षातील नेत्यांचा विरोध डावलून बारणेंना उमेदवारी मिळाली. परंतू उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बारणे हे वाघेरेंपेक्षा दुप्पट वेगाने कामाला लागले. नेत्यांच्या गाठीभेटी, आमदार-माजी आमदार, सहयोगी पक्षांचे नेते यांच्या त्यांनी वैयक्तिक गाठीभेटी घेतल्या आणि रुसवेफुगवे दूर केले. त्यापाठोपाठ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सहाही आमदारांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरून दुसऱ्याच दिवशी प्रचाराचा नारळही फोडला. तेव्हापासून बारणे मावळ लोकसभेच्या (Pimpri Chinchwad) एका टोकापासून ते दुसऱ्या टोकापर्यंत जोरदार आणि वादळी प्रचार करत आहेत. दुसरीकडे मविआकडून मात्र प्रचारात तितका वेग आणि झंझावात दिसून येत नाही. इथे अनुभवाच्या जोरावर बारणे (Shrirang Appa Barne) बाजी मारताना दिसतायेत.

Shrirang Barne 2

श्रीरंग बारणे यांना खासदारकी लढण्याचा दांडगा अनुभव आहे. सलग दोन टर्मचे खासदार असल्याने त्यांना मतदारसंघाचा सर्व लेखाजोखा माहिती आहे. यासह ते स्वतः सहाही विधानसभा मतदारसंघात फिरलेले आहेत, त्यामुळे नाही म्हटलं तरी मतदारांना ते परिचित आहेत. दुसरीकडे संजोग वाघेरे नवीन आहेत, प्रचारातून ते अजून हवे तसे मतदारांपर्यंत पोहोचले नाहीत. एकतर पक्षाचं चिन्ह नवीन आणि माणूसही नवीन, त्यात सर्वत्र विरोधक हे सत्ताधारी यामुळे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची आणि उमेवार वाघेरेंचीही कोंडी होत आहे. परंतू पुढील टप्प्यात प्रमुख नेत्यांच्या होणाऱ्या सभांमुळे हे वातावरण बदलू शकतं, असा अंदाज आहे.

News Title: Pimpri Chinchwad Shrirang Appa Barne vs Sanjog Waghere Patil

महत्त्वाच्या बातम्या-

रोहित शर्माला वाढदिवसाला मिळालं मोठं सरप्राईज, व्हिडीओ व्हायरल

पुण्याच्या ‘या’ रील स्टारसोबत राज ठाकरेंचं पहिलं रील, व्हिडीओ तूफान व्हायरल

रात्री अचानक मलायका पोहोचली अरबाजच्या घरी; ‘तो’ व्हिडीओ तूफान व्हायरल

कोल्हेंना प्रश्नावर प्रश्न, त्याच गावात आढळरावांना लोकशाही मार्गाने प्रश्न विचारायला बंदी

…त्यांची लायकी नाही!, धनंजय मुंडेंचं नाव काढताच शरद पवार भडकले, Video तुफान Viral