‘…तर सगळे पब, बार बंद करा’; देवेंद्र फडणवीसांचे पुणे पोलिसांना आदेश

Pune News | पुण्यातील हिट अँड रण प्रकरणामुळे देशातील वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर देखील संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांवर देखील आरोप करण्यात आले. आता राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलीस आयुक्तालयात जाऊन या प्रकरणाची माहिती घेतली. त्यानंतर पत्रकार परिषद घेत त्यांनी या प्रकरणी कोणालाच सोडणार नाही, असं म्हटलंय.

देवेंद्र फडणवीसांचे पुणे पोलिसांना आदेश

आजच्या बैठकीत पोलिसांना महत्त्वाच्या सूचना करण्यात आल्या आहेत. जे लोक बार किंवा पबमध्ये जातात त्यांच्याकडे लिगल डॉक्यूमेंट आहे की नाही ते चेक करा. सीसीटीव्ही लावूनच बार किंवा पबने चेक करा. या बार किंवा पबचा सीसीटीव्ही पोलीस किंवा एक्साईज विभाग चेक करतील. तसेच पुण्यात झालेल्या घटनेसारख्या घटना घडू नये म्हणून लाँग टर्मसाठी व्यवस्था करण्यात येणार आहे, असंही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

रेसिडेन्शिअल एरियात असलेल्या पबबाबत आम्ही नवीन धोरण आणणार आहोत. त्याची नियमावली तयार करणार आहोत, असं सांगतानाच पब आणि बारकडून नियमांचा भंग केला जात असेल तर ते बंद करण्याचे आदेश काढा, असे आदेशच पोलीस आयुक्तांना दिल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

माझ्याकडे एफआयआरची कॉपी आहे. पोलिसांनी रात्री 8.30 वाजता एफआयआर दाखल केला होता. त्यावेळी 304 ए कलम लावलं होतं, याकडे फडणवीस यांचं लक्ष वेधण्यात आलं. त्यावर फडणवीस यांनी सारवासारव केली. पोलिसांनी 304 कलमच लावलं होतं, 304 ए कलम लावलं नव्हतं असं सांगणाऱ्यांना फडणवीस यांनी कोर्टात जाण्यापूर्वी 304 कलम लावल्याचं सांगितलं. सीनिअरने येऊन आधी तपास केला. माहिती घेतली आणि 304 कलम लावायला सांगितलं. 304 ए लावलं तर आरोपींना निगलिजन्सचा फायदा मिळेल असं सीनिअरने सांगितलं. त्यानंतर कोर्टात जाण्यापूर्वी 304 कलम लावण्यता आलं, असं फडणवीस म्हणाले.

ज्युवेनाईल जस्टिस बोर्डाची ऑर्डर धक्कादायक आहे. आम्ही रिव्हिजन पिटीशन दाखल केली आहे. त्यावर अधिक बोलण्याची गरज नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत. दोन लोकांचा जीव घेतल्यानंतर लिनियंटली सोडून दिलं गेलं हे सहन केलं जाणार नाही, असंही देवेंद्र फडणवीस म्हणालेत.

Pune News | कल्याणीनगरमध्ये नेमकं काय घडलं?

पुणे शहराततील कोरेगाव पार्कमधील कल्याणीनगरमध्ये शनिवारी रात्री अत्यंत भीषण अपघात झाला. भरधाव वेगात पोर्शे कारने एका दुचाकीला जोरदार धडक दिली. या पोर्शे कारचा चालक हा अल्पवयीन होता. या कारने दुचाकीला एवढ्या जोरात धक्का दिला की या धडक दुचाकीवरील अनिस दुधिया आणि अश्विनी कोस्टा याचा मृत्यू झाला.

महत्त्वाच्या बातम्या- 

गजानन किर्तीकरांचं पुत्रप्रेम अखेर समोर; अगोदर लेकाविरोधात प्रचार केला, आता म्हणतात…

“जुन्या आठवणी विसरणं माझ्यासाठी..”; सलमान अजूनही एक्स गर्लफ्रेंडच्या प्रेमात?

‘मी दारु पितो हे पप्पांना माहिती आहे, तरी त्यांनी…’; लेकामुळे बाप अडचणीत

“नवऱ्याने एकनाथ शिंदेंसोबत जाऊन त्यांना सलाम ठोकणं मला अजिबात पटलं नाही”

पुणे अपघात प्रकरणी पोलीस आयुक्तांचा मोठा खुलासा!