Jallikattu Bull | शर्यतीच्या बैलाला जबरदस्ती खाऊ घातला कोंबडा, 3 जणांवर मोठी कारवाई

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Jallikattu Bull | तामिळनाडूमध्ये जनावरांप्रती क्रूरता दाखवणारी घटना घडून आली आहे. एका व्यक्तीने जल्लीकट्टू बैलाला (Jallikattu Bull) जबरदस्ती जिवंत कोंबडा खाऊ घातल्याने एकच खळबळ उडाली आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर याबाबत माहिती समोर आली. या घटनेवर देशभरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

व्हिडीओ टाकणाऱ्या यूट्यूबरविरोधात तक्रार करण्यात आली आहे. त्याने 2023 मध्ये याचा व्हिडीओ यूट्यूबवर अपलोड केला होता. बैलाला जिवंत कोंबडा खाऊ घालण्याची घटना चिन्नाप्पमपट्टी या जिल्ह्यात घडली आहे. यानंतर पोलिसांकडून याची दखल घेण्यात आली आहे.

नेमकं काय घडलं?

यूट्यूबवरील एका चॅनेलवर 2.48 मिनिटांचा एक व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. याव्हीडिओत तीन व्यक्ती एका बैलाला आपल्या नियंत्रणात आणताना दिसून येत आहेत. याचवेळी हे व्यक्ती जल्लीकट्टू बैलाला जबरदस्ती जिवंत कोंबडा खायला लावतात. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्वच क्षेत्रातून संताप व्यक्त करण्यात आला.

तर, पीपल फॉर कॅटल ऐम इंडियाचे संस्थापक अरुण प्रसन्ना यांनी या प्रकरणी पोलिस तक्रार केली आहे. त्यांनी तक्रार करत म्हटलं की, “बैल हा प्राणी शाकाहारी असतो. मात्र त्याला जबरदस्ती कोबंडा खाण्यास प्रवृत्त केलं गेलं. ही घटना अत्यंत क्रूर आहे. शाकाहारी बैल, मांस, पंख आणि हड्डी कशी चावणार? त्या बैलाला हे खाताना प्रचंड त्रास सहन करावा लागला असणार. याची मनुष्य कल्पना सुद्धा करू शकत नाही, असं अरुण प्रसन्ना यांनी म्हटलं आहे.

‘जल्लीकट्टू’ खेळ काय असतो?

अरुण प्रसन्ना यांनी धार्मिक भावना दुखावल्याचा आणि पशू क्रूरता (Jallikattu Bull) दाखवल्या प्रकरणी पोलिस तक्रार केली आहे. तसेच आरोपींना कडक शिक्षा मिळावी, अशी मागणी देखील केली आहे. मात्र पोलिसांनी अद्यापही यावर कोणतंही पाऊल उचललं नाही. अजूनही या घटनेतील आरोपींना अटक करण्यात आली नाही.

तामिळनाडू मध्ये ‘पोंगल’ उत्सवादरम्यान ‘जल्लीकट्टू’ हा खेळ खेळला जातो. हा तामिळनाडू मधील लोकप्रिय खेळ आहे. यात बैलाला गावातील लोक नियंत्रणात आणत असतात. यासाठी बैलाचे शिंग, शेपूट आणि कुबडला धरतात. सोबतच बैलाला एक रस्सी बांधली जाते. बैलाच्या शर्यतीत लोक पळून त्यांना नियंत्रणात आणत असतात. या खेळात विजेत्याला मोठे बक्षिस दिले जाते.

News Title- Jallikattu Bull Forced to Feed Live Rooster

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma ला भारतीय संघातून काढून टाकणार होते, मात्र… मोठी बातमी आली समोर

शेतकऱ्याच्या पोरानं करून दाखवलं; MPSC परिक्षेत विनायक पाटील राज्यात पहिला आला

Indian Women Hockey Match l MS Dhoni मॅच पहायला पोहोचला आणि भारतीय संघ हारला!

MHADA Lottery 2024 l Mhada कडून आनंदाची बातमी, 5311 घरांसाठी लवकरच काढणार लॅाटरी

Pakistan Targeted Militant Targets In Iran l या देशाने केला पाकिस्तानवर हल्ला