गुंतवणूकदारांना Share Market तज्ज्ञांचा सल्ला; ‘हा’ स्टॉक बनेल रॉकेट

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात (Share Market) चढ-उतार सुरूच आहेत. अशात बाजारातील तज्ज्ञ अनिल सिंघवी यांनी गुंतवणूकदारांना अत्यंत महत्त्वाचा सल्ला दिलाय.

Share Market तज्ज्ञाचा सल्ला

अनिल सिंघवी म्हणाले ईएमएसचे शेअर्स खरेदी करा. शेअरचा स्टॉप लॉस 450 रुपये ठेवा. शेअर वरच्या बाजूने 470, 475 आणि 480 रुपयांची पातळी गाठू शकतो. काल शेअर 458.7 रुपयांवर बंद झाला. मार्केट गुरूने सांगितलं की कंपनीला विकास नजर डेहराडून उत्तराखंड टेंडरचा एल-1 घोषित करण्यात आला आहे. प्रकल्पाची अंदाजे किंमत 478.93 कोटी रुपये आहे.

‘हा’ स्टॉक बनेल रॉकेट

अनिल सिंघवी म्हणाले की, डाऊच्या रिकव्हरीमुळे बाजाराला आधार मिळेल. तसेच इंडसइंड बँकेच्या निकालामुळे दिलासा मिळेल. पण FII कडून 20,000 कोटी रुपयांची प्रचंड विक्री 2 दिवसांत दिसून आली. चांगली गोष्ट म्हणजे असं असूनही बाजारात फारशी घसरण झाली नाही.

आज खालच्या स्तरावर खरेदीच्या संधी आहेत. गुंतवणूकदारांनी शॉर्टिंगमध्ये घाई करू नये आणि उतावीळ होऊ नये. 15-20% घसरणीसह चांगल्या मिडकॅप्समध्ये गुंतवणूक करा, असं सिंघवी म्हणालेत.

दरम्यान, गेल्या तीन दिवसांतील प्रचंड घसरणीनंतर आज शेअर बाजारात (Stock Market) जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. खरेदीचा मंदावलेला वेग आणि ग्लोबल मार्केटमधील रिकव्हरी यामुळे शेअर बाजाराला काहीसा आधार मिळाला आहे.

सेन्सेक्स आणि निफ्टीनं 0.80 टक्क्यांपर्यंत वाढीसह व्यवहारात चांगली सुरुवात केली. काल (गुरुवारी) सेन्सेक्स 71,186.86 वर बंद झाला. त्या तुलनेत शुक्रवारी सेन्सेक्स 600 अंकांनी वाढून 71,786.74 वर उघडला.

महत्त्वाच्या बातम्या- 

Ram Mandir l 22 जानेवारीला कुठल्या राज्यांनी दिली सुट्टी, महाराष्ट्रात पण सुट्टी देणार?, मोठी बातमी

Rohit Sharma ला भारतीय संघातून काढून टाकणार होते, मात्र… मोठी बातमी आली समोर

शेतकऱ्याच्या पोरानं करून दाखवलं; MPSC परिक्षेत विनायक पाटील राज्यात पहिला आला

Indian Women Hockey Match l MS Dhoni मॅच पहायला पोहोचला आणि भारतीय संघ हारला!

MHADA Lottery 2024 l Mhada कडून आनंदाची बातमी, 5311 घरांसाठी लवकरच काढणार लॅाटरी