Ram Mandir l 22 जानेवारीला कुठल्या राज्यांनी दिली सुट्टी, महाराष्ट्रात पण सुट्टी देणार?, मोठी बातमी

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ram Mandir l 22 जानेवारीला अयोध्येत प्रभू श्रीराम यांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. हा सोहळा दुपारी 12.20 मिनिटांनी सुरू होणार असून यावेळी पंतप्रधान मोदींसह अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सोबतच यावेळी अयोध्येत प्रत्येक राज्यातील ऋषी-मुनीही सहभागी (Ram Mandir) होणार असल्याचे सांगण्यात येते. याचवेळी मुख्यमंत्री योगी यांनीही संपूर्ण राज्याला सुट्टी जाहीर केली आहे. तर केंद्राने देखील अनेक राज्यांना अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे.

परंतु, केंद्र सरकारने व राज्य सरकारने अर्ध्या दिवसाच्या सुट्टीची घोषणा केल्यानंतर अनेक लोकांमध्ये संभ्रम आहे की, सुट्टीच्या आदेशाच कसं आणि कुठे पालन होणार? नेमके कोणते ऑफिस बंद असणार तर कोणते सुरु असणार? कोणकोणत्या विभागांना सुट्टी असणार? चला तर मग सोप्या भाषेत जाणून घेऊयात कि नेमकी सुट्टी आहे तर कुठे? (Ram Mandir)

Ram Mandir l 22 जानेवारी रोजी या 7 राज्यांना असणार अर्ध्या दिवसाची सुट्टी :

उत्तर प्रदेशात सार्वजनिक सुट्टी : भारतातील रामनगरी म्हणून उत्तर प्रदेशचा खूप मोठा मान आहे, त्यामुळे उत्तर प्रदेशच्या आदेशानुसार 22 जानेवारीला सर्व शैक्षणिक संस्था आणि सरकारी कार्यालयांना सुट्टी असणार आहे. एवढेच नव्हे तर 22 जानेवारी हा दिवस उत्तर प्रदेशमध्ये दिवाळीसारखा (Ram Mandir) साजरा करण्याचे आवाहन मुख्यमंत्री योगी यांनी केले आहे.

छत्तीसगड : अयोध्या राम मंदिरातील अभिषेक सोहळ्यानिमित्त छत्तीसगड सरकारने राज्यभरातील सर्व शैक्षणिक संस्थांना अधिकृत सुट्टी जाहीर केली आहे.

गोवा : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही राज्यात अधिकृतपणे 22 जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. तर दिवशी गोव्यात सर्व दारू आणि भांग दुकान बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत

हरियाणा : मनोहर लाल खट्टर यांच्या (Ram Mandir) सरकारनेही शाळा तात्पुरत्या बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय यादिवशी राज्यभरात मद्यपान करण्यास बंदी घालण्यात आली आहे. यासोबतच ओडिशा, राज्यस्थान, आसाम, मध्यप्रदेश या राज्यांमध्ये देखील अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे.

Ram Mandir l देशातील या राज्यांमध्ये अद्याप सुट्टीबाबत अधिकृत घोषणा नाही

अरुणाचल प्रदेश, आंध्र प्रदेश, बिहार, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, केरळ, झारखंड, महाराष्ट्र, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, तेलंगणा, पंजाब, सिक्कीम, तामिळनाडू, त्रिपुरा, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, अंदमान आणि निकोबार (UT), दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव (UT), दिल्ली, जम्मू आणि काश्मीर (UT), लडाख (UT), लक्षद्वीप (UT), पुद्दुचेरी (UT).

News Title :Rram Mandir Holiday News

महत्त्वाच्या बातम्या –

Rohit Sharma ला भारतीय संघातून काढून टाकणार होते, मात्र… मोठी बातमी आली समोर

शेतकऱ्याच्या पोरानं करून दाखवलं; MPSC परिक्षेत विनायक पाटील राज्यात पहिला आला

Indian Women Hockey Match l MS Dhoni मॅच पहायला पोहोचला आणि भारतीय संघ हारला!

MHADA Lottery 2024 l Mhada कडून आनंदाची बातमी, 5311 घरांसाठी लवकरच काढणार लॅाटरी

Pakistan Targeted Militant Targets In Iran l या देशाने केला पाकिस्तानवर हल्ला