Ram Mandir | रामलल्लाच्या मूर्तीची गर्भगृहात स्थापना, ‘या’ ठिकाणी विराजणार भाऊ लक्ष्मण-भरत आणि शत्रुघ्न

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ram Mandir | अयोध्येत राममंदिराच्या गर्भगृहात काल (18 जानेवारी) रामलल्लाची मूर्ती (Ram Mandir ) स्थापित करण्यात आली. प्रसिद्ध मूर्तिकार अरुण योगिराज यांनी रामलल्लाची मूर्ती तयार केली आहे. त्याची ऊंची 51 इंच एवढी आहे. मूर्ती स्थापनेपुर्वी ‘जय श्रीराम’च्या मोठ्या घोषणा देण्यात आल्या. भाविकांनी देखील रामलल्लाला बघण्यासाठी गर्दी केली होती. आता येत्या 22 जानेवारीला मूर्तीची प्राण प्रतिष्ठा होईल.

रामलल्लाच्या मूर्तीसोबतच त्यांचे भाऊ लक्ष्मण-भरत आणि शत्रुघ्न यांना कोठे विराजमान होणार हा प्रश्न सर्वांनाच पडला होता. तर, लक्ष्मण-भरत आणि शत्रुघ्न यांना रामलल्लाच्या नव्या मूर्तीसमोरच ठेवण्यात येणार असल्याचं कळतंय. तर, प्रभू राम यांची जुनी मूर्तीदेखील 22 जानेवारीपूर्वी नव्या मूर्तीसमोर ठेवण्यात येणार आहे.

‘या’ ठिकाणी विराजणार रामलल्लाचे भाऊ

1949 पासून अयोध्येमध्ये जुन्या मूर्तीचीच पूजा केली जात आहे. या जुन्या मूर्तीची ऊंची फक्त सहा इंच आहे. तर, लक्ष्मण-भरत आणि शत्रुघ्न यांची मूर्ती यापेक्षाही लहान आहेत. आता या जुन्या मूर्ती सोहळ्यापूर्वी मंदिराच्या (Ram Mandir ) गर्भगृहात ठेवल्या जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी याची प्राण प्रतिष्ठा करतील.

नव्या मूर्तीची जेव्हा गर्भगृहात स्थापना करण्यात आली तेव्हा सर्व प्रभू रामाचे मुखदर्शन घेण्यासाठी आतुर होते. मात्र सध्या मूर्तीचे मुख दर्शन कुणालाच होणार नाही. याचे अनावरण मोदींच्या हस्ते झाल्यानंतरच सर्वांना रामलल्लाचे दर्शन होईल. नव्या मूर्तीची ऊंची ही तब्बल आठ फुट आहे. हा भव्य दिव्य सोहळा 22 जानेवारीला होणार आहे.

प्राण प्रतिष्ठेपूर्वीच्या विधींना झाली सुरुवात

प्राण प्रतिष्ठेपूर्वीच्या (Ram Mandir ) विधी अयोध्येत सुरू झाल्या आहेत. या विधी हे 21 जानेवारीपर्यंत चालणार आहेत. शरयू नदीच्या काठावर नुकतेच कलश पूजन करण्यात आले, यामध्ये शेकडो नागरिकांचा देखील सहभाग होता. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे मुख्य शिल्पकार पंडित लक्ष्मीकांत दीक्षित यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी सोहळ्याचे प्रमुख यजमान असणार असल्याचं सांगितलं आहे.

अयोध्येत या भव्य सोहळ्याला आठ हजार निमंत्रित उपस्थित राहणार असल्याचे म्हटले जात आहे. यासाठी आता पासूनच भव्य तयारी केली जात आहे. या दिवशी देशभरातील विविध शास्त्रीय वाद्यांचं वादन केलं जाणार आहे. या कार्यक्रमासाठी भारताच्या विविध भागांतील संगीतकारांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या देशातील वातावरण धार्मिक झाले आहेत.

News Title- Ram Mandir new lord ram idol in garbh griha

महत्वाच्या बातम्या-

Google Chrome ने बदलली पॅालिसी, आता अशाप्रकारे सर्च केलं तर खासगी राहणार नाही!

Jallikattu Bull | शर्यतीच्या बैलाला जबरदस्ती खाऊ घातला कोंबडा, 3 जणांवर मोठी कारवाई

गुंतवणूकदारांना Share Market तज्ज्ञांचा सल्ला; ‘हा’ स्टॉक बनेल रॉकेट

Ram Mandir l 22 जानेवारीला कुठल्या राज्यांनी दिली सुट्टी, महाराष्ट्रात पण सुट्टी देणार?, मोठी बातमी

Rohit Sharma ला भारतीय संघातून काढून टाकणार होते, मात्र… मोठी बातमी आली समोर