Shoaib Malik | घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान शोएब मलिकनं केलं दुसरं लग्न; सर्वांनाच दिला धक्का

Shoaib Malik | पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकने (Shoaib Malik) अभिनेत्री सना जावेदसोबत लग्न केलं आहे. खरं तर, भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झापासून त्याच्या घटस्फोटाची अनेक दिवसांपासून चर्चा होती. अशात शोएब मलिकने अचानक लग्न करून सगळ्यांना धक्का दिला आहे.

याआधी सानिया मिर्झाने बुधवारीच एक पोस्ट शेअर केली होती, ज्यामुळे तिच्या आणि शोएब मलिकमधील घटस्फोटाच्या अफवा आणखीन वाढल्या होत्या. यात तिने लिहिलं होतं की, ‘लग्न कठीण आहे. घटस्फोट घेणं कठीण आहे, असं सानिया म्हणाली होती.

शोएब मलिकनं केलं दुसरं लग्न

स्वत: शोएबने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत लग्न केल्याची बातमी दिली आहे. ही घटना अशावेळी घडलीये जेव्हा शोएब आणि सानिया यांच्या घटस्फोटाच्या बातम्या येत होत्या. अशात शोएब आणि सना यांनी लग्न करत सर्वांनाच धक्का दिलाय. शोएब मलिकने त्याच्या लग्नचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलेत. हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Shoaib Malik | पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत थाटला संसार

शोएब आणि सना यांच्या डेटिंगच्या बातम्या येत होत्या. शोएबनेही अलीकडेच सनाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. शोएबने लिहिलं होतं- हॅपी बर्थडे बडी! यासोबतच त्याने सनासोबतचा एक फोटोही शेअर केला होता.

पाकिस्तानच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक सना जावेद एक आहे. तिचाह घटस्फोट झाला आहे. तिने 2020 मध्ये उमेर जसवालशी लग्न केलं. मात्र दोघे लवकरच वेगळे झाले.

दोघांनीही आपापल्या अकाऊंटवरून एकमेकांचे फोटो डिलीट केले. त्यानंतर दोघांमध्ये घटस्फोटाचं प्रकरण समोर आलं. 28 वर्षीय सना पाकिस्तानच्या अनेक टीव्ही शोमध्ये दिसली आहे.

 

 

 

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Shoaib Malik (@realshoaibmalik)

(बातमी अपडेट होत आहे).

महत्त्वाच्या बातम्या-

Petrol Diesel Price Today | पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार?, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे रेट

Manoj Jarange | ‘छातीवर गोळ्या लागल्या तरी…’; मनोज जरांगे रडले

Gold-Silver Price Today | सोनं महागलं; जाणून घ्या आजचे दर

T20 World Cup 2024 | हार्दिक पांड्या की शिवम दुबे?, वर्ल्डकपला कुणाला संधी, मोठी माहिती समोर

Team India चं टेंशन वाढवणारी बातमी समोर!