PPF Vs SIP, कुठे मिळेल दुप्पट परतावा, जाणून घ्या

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

PPF Vs SIP | भविष्यात कठीण प्रसंगी कुणासमोर हात पसरवायची वेळ येऊ नये, म्हणून आपण आतापासूनच पैशांची गुंतवणूक करत असतो. यासाठी अनेक सरकारी किंवा प्रायवेट संस्थांमध्ये आपण पैसे जमा करत असतो. मात्र कधी कधी पैशांची गुंतवणूक केली तरी त्याचा परतावा मिळण्याचा काळ अधिक असतो. तुम्हीही जर सरकारची गॅरंटीवाली PPF आणि SIP (PPF Vs SIP) मध्ये संभ्रमित असाल तर ही माहिती तुमच्यासाठीच आहे.

काही व्यक्ती सरकारची गॅरंटीवर विश्वास ठेऊन PPF मध्ये गुंतवणूक करतात. तर काही जन रिस्क घेऊन SIP मध्ये अधिक परतावा प्राप्त करतात. PPF आणि Mutual Funds SIP या दोन्ही अशा योजना आहेत. पीपीएफ ही एक सरकारी हमी योजना आहे ज्यामध्ये दीर्घकाळ गुंतवणूक करावी लागते.

PPF की SIP?

PPF ही 15 वर्षांनी परिपक्व होत असते. तर SIP ही मार्केट लिंक्ड स्कीम आहे, ज्यामध्ये परताव्याची हमी नाही,दिली जात नाही. (PPF Vs SIP) मात्र, अधिक नफा मिळवण्याची पुरेपूर संधी असते. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कितीही कालावधीसाठी SIP चालवू शकता आणि तुम्हाला पाहिजे तेव्हा पैसे काढू शकता. त्यात दीर्घकालीन SIP हा फायदेशीर करार म्हटला जातो.

तुम्ही जर या दोन्ही स्कीममध्ये नेमके काय निवडावे याचा विचार करत असाल तर, तुम्हाला 15 वर्षांसाठी दोन्ही योजनांमध्ये प्रत्येक महिन्याला 5000 रुपये गुंतवले तर त्यापैकी किती पैसे कमावले जातील, याची माहिती इथे मिळून जाईल.

“..तर मिळेल दुप्पट परतावा”

सरकारची हमी असणारी PPF योजना (PPF Vs SIP) सध्या 7.1 टक्के परतावा देत आहे. या योजनेत तुम्ही महिन्याला 5000 ची गुंतवणूक केली तर तुम्ही वर्षाला 60,000 रुपयांची गुंतवणूक कराल. असेच 15 वर्षांत तुमच्याकडे एकूण 9,00,000 रुपयांची गुंतवणूक होईल. 7.1 नुसार तुम्हाला 7,27,284 रुपये व्याज म्हणून मिळतील आणि अशा प्रकारे तुम्हाला मॅच्युरिटीवरील व्याजासह एकूण 16,27,284 रुपये मिळतील.

दुसरीकडे मार्केट लिंक्ड असलेल्या SIP मधील गुंतवणूक तुम्हाला जोखीमीची आहे. तुम्हाला यात फायदाही होऊ शकतो. किंवा प्रचंड मोठे नुकसानदेखील होऊ शकते. या एसआयपीमध्ये 12 टक्के व्याज मिळते. कधीकधी व्याजची रक्कम अधिकही असते. जर तुम्ही SIP द्वारे म्युच्युअल फंडमध्ये महिन्याला 5000 गुंतवले तर तुम्ही त्यात वार्षिक 60,000 रुपये गुंतवाल आणि 15 वर्षात तुमच्याकडे एकूण 9,00,000 रुपयांची गुंतवणूक होईल.

त्यामुळे 12 टक्के सरासरी रिटर्ननुसार कॅलक्युलेशन केले तर, तुम्हाला फक्त 16,22,880 रुपये व्याज मिळले. अर्थातच PPF मध्ये मॅच्युरिटीवर जितकी रक्कम मिळेल, तितकीच रक्कम तुम्हाला फक्त व्याजातून मिळू शकते. अयात जर तुम्ही 15 वर्षे गुंतवणूक केली तर, तुम्हाला गुंतवलेली रक्कम आणि व्याजाच्या रकमेसह एकूण 25,22,880 रुपये मिळतील. जर परतावा 12 टक्क्यांपेक्षा अधिक असेल तर यात अजून वाढ होऊ शकते. यात जोखीम आहे, पण फायदाही मोठा ठरू शकतो.

News Title-  PPF Vs SIP Do the calculation like this

महत्वाच्या बातम्या- 

Manoj Jarange | ‘छातीवर गोळ्या लागल्या तरी…’; मनोज जरांगें रडले

Gold-Silver Price Today | सोनं महागलं; जाणून घ्या आजचे दर

T20 World Cup 2024 | हार्दिक पांड्या की शिवम दुबे?, वर्ल्डकपला कुणाला संधी, मोठी माहिती समोर

Team India चं टेंशन वाढवणारी बातमी समोर!

Rashmika Mandanna | ‘मी जोरात ओरडले, रडले…’; ‘या’ अभिनेत्याचं नाव घेत रश्मिका मंदानाने केला खुलासा