Post Office | पोस्टाची भन्नाट योजना; व्याजातूनच कराल बक्कळ कमाई

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Post Office | भारतीय पोस्ट ऑफिस (Post Office) नेहमीच आकर्षक व्याजदरासह नवीन-नवीन स्कीम आणत असते. आता अशीच एक नवीन स्कीम पोस्ट ऑफिसने काढली आहे. ज्यात तुम्ही महिन्याला कमाई करू शकता. कमी गुंतवणुकीतही तुम्ही अधिक पैसे कमवू शकता. पोस्ट ऑफिसने अशा 12 वेगवेगळ्या स्कीम आणल्या आहेत.

त्यातील पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम अधिक चर्चेत आहे. कारण यात तुम्ही गुंतवणूक केलेल्या पैशात अधिक रक्कम व्याजाच्या स्वरूपात प्राप्त करू शकता. तेही दर महिन्याला. याबाबत पोस्ट ऑफिसने काही नियम आणि अटी देखील ठेवल्या आहेत.

Post Office ने आणली नवीन स्कीम

पोस्ट ऑफिसच्या (Post Office) या योजनेंतर्गत भारत सरकारने गुंतवणूक रक्कम 4 लाख रुपये केली होती. ती वाढवून आता 9 लाख रुपये करण्यात आली आहे. पण सध्या याची रक्कम 15 लाख रुपये करण्यात आली आहे आणि त्यात गुंतवणूक करण्यासाठी किमान रक्कम 1000 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. ही योजना पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना म्हणून ओळखली जाते. या अंतर्गत तुम्ही प्रत्येक महिन्याला ठराविक रक्कम प्राप्त करू शकता.

तुम्ही गुंतवलेल्या रकमेवर पोस्ट ऑफिसकडून दर महिन्याच्या शेवटी निश्चित व्याजाची रक्कम दिली जाते. आपण गुंतवलेला रकमेवर पोस्ट ऑफिसने दिलेला व्याजदर हा दत तीन महिन्यांनंतर सुधारित केला जातो. यानुसार प्रत्येक तीन महिन्यांनी तुम्हाला गुंतवणूक केलेल्या रकमेवर व्याज दिले जाते. तुम्ही खाते उघडल्यापासून ते निश्चित तारखेपर्यंत तुम्हाला दर महिन्याला व्याज मिळत राहील. यासाठी तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या काही नियमांचं पालन करणं गरजेचं आहे.

Post Office च्या नव्या स्कीमचे नियम आणि अटी-

तुम्हाला दर महिन्याला व्याज स्वरूपात पैसे प्राप्त करायचे असेल तर पोस्ट ऑफिसने (Post Office) ठरवलेले नियम आणि अटीचे पालन करणे गरजेचे आहे. हे नियम खालीलप्रमाणे-

  1. पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेचा कालावधी हा 5 वर्षे आहे.
  2. तुमच्या ठेवीची तारीख निघून गेल्यास, त्यानंतर तुम्ही एका वर्षासाठी जमा केलेली रक्कम काढू शकत नाही.
  3. जर तुम्ही या योजनेअंतर्गत उघडलेले खाते एक वर्षांनंतर किंवा 3 वर्षांपूर्वीच बंद केले तर, तुम्ही गुंतवलेल्या मूळ रकमेपैकी 2% वजा केली जाईल.
  4. तुम्ही 3 वर्षांनी खाते बंद केले तर, गुंतवलेल्या मूळ रकमेपैकी एक टक्का वजा केला जाईल. या योजनेसाठी तुम्ही 1000 पासून ते 15 लाख पर्यंत रक्कम भरू शकता. मात्र, त्यापूर्वी या नियमांवर लक्ष असू द्या.

News Title: Post Office new MIS Scheme

महत्त्वाच्या बातम्या-

Petrol Diesel Price Today | पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार?, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे रेट

Manoj Jarange | ‘छातीवर गोळ्या लागल्या तरी…’; मनोज जरांगे रडले

Gold-Silver Price Today | सोनं महागलं; जाणून घ्या आजचे दर

T20 World Cup 2024 | हार्दिक पांड्या की शिवम दुबे?, वर्ल्डकपला कुणाला संधी, मोठी माहिती समोर

Team India चं टेंशन वाढवणारी बातमी समोर!