Shoaib Malik ने ‘या’ अभिनेत्रीसाठी मोडलं सानियासोबतचं लग्न!

Shoaib Malik | पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक आणि भारतीय टेनिस स्टार सानिया मीर्झा या दोघांच्या नात्यामध्ये दुरावा असल्याच्या चर्चा होेत्या. शिवाय दोघेजण घटस्फोट घेणार असल्याच्या देखील जोरदार चर्चा रंगल्या होत्या. मात्र, या दोघांनी देखील याबाबत कधी भाष्य केलं नव्हतं. याच वेळी सानिया मीर्झाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. एकीकडे घटस्फोटाच्या चर्चा सुरु असताना दुसरीकडे शोएब मलिकने अभिनेत्रीसोबत नवा संसार थाटला आहे.

काय आहे नेमका प्रकार?

शोएब मलिकने (Shoaib Malik) सर्वांनाच मोठा धक्का दिला. सध्या सोशल मीडियावर शोएब मलिक आणि सना जावेद दोघे ट्रेंडिंगमध्ये आले आहेत. शिवाय सोशल मीडियावर दोघांच्या लग्नाचे फोटो तूफान व्हायरल होत आहेत. शोएबने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत लग्नगाठ बांधली आहे.

शोएब आणि सना या दोघांमध्ये 11 वर्षांचं अंतर असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी शोएबने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर सनाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. यावेळेस त्यांनी फोटो देखील शेअर केले होते शिवाय ‘Happy Birthday Buddy!’ असं शोएबने लिहिलं होतं.

शोएबचं तिसरं लग्न?

सानिया मिर्झा आणि शोएब मलिक (Shoaib Malik) दोघेजण एकमेकांना पाच महिने डेट करत होते. त्यानंतर दोघेजण लग्नबंधनात अडकले. दरम्यान, या आधी शोएब मलिकचं आयेशा सिद्धीकीसोबत लग्न झालं होतंं. शिवाय सानिया मिर्झाचा साखरपुडा सोहराब मिर्झासोबत झाला होता.

sana javed

त्याच्यासोबतचा साखरपुडा मोडून सानियाने शोएबसोबत लग्नगाठ बांधली. मात्र, कोरोनाकाळात या दोघांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झाला होता आणि त्यानंतर त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु झाल्या.

सानिया मिर्झाची पोस्ट व्हायरल

जेव्हा एखादी गोष्ट तुमच्या हृदयातील शांतता नष्ट करते, तेव्हा ती जाऊ द्या, अशा आशयाची पोस्ट सानियाने (Sania Mirza) काही दिवसांपुर्वी केली होती. यासोबतच पांढऱ्या ड्रेसवरील दोन फोटोही तीने पोस्ट केले आहेत. या फोटो आणि कॅप्शनमुळे त्यांच्यात काही ठीक नसल्याचं म्हटलं जात होतं.

News Title : shoaib malik married with this actress

महत्त्वाच्या बातम्या-

Rashibhavishya | ‘या’ राशींनी सावध रहावं, नाहीतर होईल मोठं आर्थिक नुकसान

Ajit Pawar | बाबांनो तुम्हाला विनंती करतो एक, दोन अपत्यावर थांबा नाहीतर…- अजित पवार

Shoaib Malik | घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान शोएब मलिकनं केलं दुसरं लग्न; सर्वांनाच दिला धक्का

Petrol Diesel Price Today | पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार?, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे रेट

Manoj Jarange | ‘छातीवर गोळ्या लागल्या तरी…’; मनोज जरांगे रडले