IPL 2024 चे भविष्य भारत सरकारच्या हाती! पण का? BCCI ने दिली माहिती

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

IPL 2024 । इंडियन प्रीमिअर लीग म्हणजे जगातील सर्वात लोकप्रिय ट्वेंटी-20 लीग. या लीगचा हिस्सा व्हावं अशी प्रत्येक क्रिकेटपटूची इच्छा असते. आयपीएल आता आपल्या आगामी हंगामाकडे कूच करत आहे. आयपीएलचा सतरावा हंगाम चाहत्यांसाठी खास असणार आहे. सर्व चाहते आयपीएल 2024 ची आतुरतेने वाट पाहत आहेत. आयपीएल 2024 चा थरार 22 मार्चपासून सुरू होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी आयपीएल आणि महिला प्रीमिअर लीगच्या वेळापत्रकाबद्दल मोठे विधान केले आहे. महिला प्रीमिअर लीगचा दुसरा हंगाम दिल्ली आणि बंगळुरू येथे खेळवला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. ते ‘इनसाइड स्पोर्ट्स’शी बोलत होते. या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमुळे आयपीएल भारताबाहेर होणार का याबद्दलही राजीव शुक्ला यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

BCCI ने दिली माहिती

2024 हे वर्ष निवडणुकांचे वर्ष आहे. आगामी काळात लोकसभा निवडणूक पार पडणार आहे. त्याची अद्याप तारीख जाहीर झाली नाही. मात्र, आयपीएलच्या तारखेत किंवा स्थळात या निवडणुकीमुळे बदल होण्याची दाट शक्यता आहे. लोकसभा निवडणूक मार्च-एप्रिलमध्ये घेतल्यास आयपीएल भारताबाहेर खेळवली जाणार असल्याचे कळते. यासाठी बीसीसीआयचे शिष्टमंडळ सरकारशी चर्चा करणार आहे.

IPL 2024 कुठे होणार?

बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी सांगितले की, आयपीएल भारताबाहेर खेळवायची की नाही याबाबत भारत सरकार आणि गृह मंत्रालयाशी चर्चा सुरू आहे. त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतरच निर्णय जाहीर केला जाईल. आताच्या घडीला काहीच सांगता येणार नाही. आयपीएल देशातही होऊ शकते किंवा देशाबाहेर देखील… दोन्हीही शक्यता नाकारता येत नाहीत.

आयपीएलच्या माजी अध्यक्षांनी आणखी सांगितले की, महिला प्रीमिअर लीगचा आगामी हंगाम बंगळुरू आणि दिल्ली येथे खेळवला जाईल. आयपीएल आणि डब्ल्यूपीएलची तयारी सुरू आहे. महिला प्रीमिअर लीगच्या दुसऱ्या हंगामातील निम्मे सामने बंगळुरूत तर उर्वरीत सामने देशाच्या राजधानीत दिल्लीत होतील. खरं तर पदार्पणाचा हंगाम मुंबईत पार पडला होता.

सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 22 मार्चपासून मेगा लीग सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बीसीसीआय यंदाची आयपीएल भारताबाहेर हलवण्याचा विचार करत आहे. तर, महिला प्रीमिअर लीग भारतातच होईल. आयपीएल म्हणजे क्रिकेट विश्वासाठी पर्वणीच असते. या व्यासपीठावर जगभरातील नामांकित खेळाडू आपल्या कौशल्याच्या जोरावर चाहत्यांचे मनोरंजन करतात. आयपीएलमध्ये खेळणाऱ्या प्रत्येक शिलेदाराला प्रसिद्धी देखील मिळत असते.

News Title- BCCI Vice President Rajeev Shukla gave great information about IPL 2024
 महत्त्वाच्या बातम्या –

Sara Tendulkar अन् गिलच्या नात्याचे ‘शुभ’ संकेत; कॅमेरा दिसताच सचिनच्या लेकीनं चेहरा लपवला, VIDEO

Ram Mandir Ayodhya | 22 तारखेला बॉलिवूडलाही सुट्टी; रामललाच्या कार्यक्रमाचा उत्साह शिगेला

Sharad Pawar | 1980 ची आठवण करून देत शरद पवारांचा अजित पवारांना थेट इशारा!

‘पप्पा 26 जानेवारीला डायरेक्ट…’; Manoj Jarange च्या मुलीने केलं आवाहन

Sania Mirza | शोएबसोबत लग्न करण्यापूर्वी सानियाने ठरलेलं लग्न मोडलेलं; ‘या’ व्यक्तीच्या होती प्रेमात