Ram Mandir Ayodhya | 22 तारखेला बॉलिवूडलाही सुट्टी; रामललाच्या कार्यक्रमाचा उत्साह शिगेला

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ram Mandir Ayodhya | अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचा उत्साह शिगेला पोहचला आहे. आता अवघ्या काही तासांचा कालावधी उरली आहे. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर देशभर आनंदाचे वातावरण आहे. प्राणप्रतिष्ठानिमित्त अनेक राज्यांमध्ये शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत या खास प्रसंगी बॉलिवूड इंडस्ट्रीही बंद राहणार आहे. माहितीनुसार, राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी 100 चित्रपटांचे चित्रीकरण होणार नाही. त्या दिवशी सर्व कामे बंद ठेवली जातील.

ज्या क्षणाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण अवघ्या काही तासांच्या अंतरावर आहे. रामलला येत आहेत याचा प्रत्येक देशवासियाला आनंद आहे. प्रत्येकजण या भावनिक क्षणाची वाट पाहत आहे. अशा प्रसंगी काही राज्यांमध्ये सुट्टी जाहीर करण्यात आली आहे तर काही राज्यांमध्ये अर्धा दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजने देखील सोमवारची राष्ट्रीय सुट्टी घोषित केली आहे.

कार्यक्रमाचा उत्साह शिगेला

दरम्यान, 22 जानेवारी 2024 रोजी बॉलिवूड बंद राहणार आहे. FWICE चे अध्यक्ष बीएन तिवारी यांनी आपल्या निवेदनाद्वारे ही घोषणा केली. त्यांनी म्हटले आहे की, आम्ही या विशेष प्रसंगी सुट्टी जाहीर करतो. या दिवशी कोणत्याही चित्रपटाचे शुटिंग होणार नाही कारण आमचे सर्व सहकारी सुट्टीवर असतील.

Ram Mandir Ayodhya अन् बॉलिवूडला सुट्टी

तिवारी यांनी असेही सांगितले की, जर एखादी आपत्कालीन परिस्थिती असेल किंवा एखाद्याचे मोठे नुकसान होत असेल तर अशा परिस्थितीत संबंधितांनी मदत करावी ही विनंती. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊनच शूटिंगला परवानगी दिली जाईल. त्यासाठी पत्राद्वारे कळवता येऊ शकते. अयोध्येतील रामललाच्या प्राणप्रतिष्ठानिमित्त देशभरात एक वेगळाच उत्साह पाहायला मिळत आहे.

भक्तांना घरबसल्या रामललाचा अभिषेक सोहळा पाहता यावा यासाठी विशेष व्यवस्था देखील करण्यात आली आहे. अयोध्येतून या प्राणप्रतिष्ठेचे थेट प्रक्षेपण 70 हून अधिक शहरांतील 160 हून अधिक चित्रपटगृहांमध्ये दाखवले जाणार आहे. त्याचे शुल्कही निश्चित करण्यात आले आहे. हे थेट प्रक्षेपण तुम्ही तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात 100 रुपयांमध्ये पाहू शकता.

कलाकारांचा अयोध्येत मेळावा

प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी अनेक कलाकारांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. त्यात बॉलिवूड आणि साऊथ इंडस्ट्रीतील कलाकारांचा समावेश आहे. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन, अनुपम खेर, अजय देवगण, सनी देओल, हेमा मालिनी, रणबीर कपूर, आलिया भट्ट, मधुर भांडारकर आणि संजय लीला भन्साळी यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे.

News Title- Bollywood has also been given a holiday on 22nd
महत्त्वाच्या बातम्या –

Sharad Pawar | 1980 ची आठवण करून देत शरद पवारांचा अजित पवारांना थेट इशारा!

‘पप्पा 26 जानेवारीला डायरेक्ट…’; Manoj Jarange च्या मुलीने केलं आवाहन

Sania Mirza | शोएबसोबत लग्न करण्यापूर्वी सानियाने ठरलेलं लग्न मोडलेलं; ‘या’ व्यक्तीच्या होती प्रेमात

Sana Javed | शोएब मलिकच्या तिसऱ्या पत्नीने ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याशी केलं होतं पहिलं लग्न!

एकीसोबत घटस्फोट, दुसरीसोबत अफेरच्या चर्चा, तिसऱ्याच व्यक्तीसोबत Shoaib Malik ने थाटला संसार!