Sharad Pawar | 1980 ची आठवण करून देत शरद पवारांचा अजित पवारांना थेट इशारा!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | वयस्कर लोक संधीच देत नाही, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर नाव न घेता टीका केली.  अजित पवारांनी केलेल्या टीकेवर शरद पवार (Sharad Pawar) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवारांनी अजित पवार यांना थेट इशारा दिलाय.

शरद पवारांचा अजित पवारांना इशारा

शरद पवार (Sharad Pawar) सोलापूर दौऱ्यावर असताना त्यांना याबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले, मी तरुणांना संधी देत नाही. मग अजित पवार कुठून आले आणि त्यांना कुणी आणलं. त्यांना पहिल्यांदा तिकीट कुणी दिलं आणि असं किती लोकांबद्दल सांगू, असं शरद पवार म्हणालेत. तसेच अजित पवार सध्या काहीही बोलत आहे. त्यांच्या बोलण्याकडे फार लक्ष द्यायचं नाही, असंही पवार म्हणालेत.

बारामतीतील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना शरद पवारांनी अजित पवारांवर भाष्य केलं. सत्ता दिली, मंत्री केलं तरी सोडून गेलेत. मात्र 1980 साली जे सोडून गेलेत त्यांचा निवडणुकीत पराभव झाला, असं सूचक वक्तव्य शरद पवार यांनी केलं.

1980 मध्ये इंग्लंडला गेलो. त्यावेळी 70 आमदार होते. पण परत आल्यावर 62 आमदार सोडून गेले होते. मात्र त्यानंतरच्या निवडणुकीत 58 आमदारांना घरी बसवलं. हीच स्थिती येत्या निवडणुकीत दिसेल, असं शरद पवार म्हणालेत. कर्तृत्व असतानाही मुलगी सुप्रियाला मंत्री केलं नाही. तिला बाजूला ठेवलं, असं पवार म्हणालेत.

Sharad Pawar | शरद पवारांची मोदींवर टीका

पंतप्रधान मोदींनी देशातील बेरोजगारी, महागाई या दोन प्रश्नांचा कुठेतरी ओझरता उल्लेख केला असता, तर अधिक बरं झालं असतं. पण मुळ प्रश्नावरून लोकांना बाजूला नेण्याची कामगिरी त्यांनी केली, अशी टीका पवारांनी केलीये.

सोलापूरमधील विधायक कामाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी चार चांगले शब्द बोलले असते, तर चांगले झाले असते. निवारा देण्यासाठी ज्यांनी कष्ट केले त्यांच्याबद्दल बोलण्याची गरज होती, अशा शब्दात शरद पवार यांनी आपली खंत बोलून दाखविली

महत्त्वाच्या बातम्या- 

‘पप्पा 26 जानेवारीला डायरेक्ट…’; Manoj Jarange च्या मुलीने केलं आवाहन

Sania Mirza | शोएबसोबत लग्न करण्यापूर्वी सानियाने ठरलेलं लग्न मोडलेलं; ‘या’ व्यक्तीच्या होती प्रेमात

Sana Javed | शोएब मलिकच्या तिसऱ्या पत्नीने ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याशी केलं होतं पहिलं लग्न!

एकीसोबत घटस्फोट, दुसरीसोबत अफेरच्या चर्चा, तिसऱ्याच व्यक्तीसोबत Shoaib Malik ने थाटला संसार!

Sania Mirza | शोएबच्या लग्नानंतर सानिया मिर्झाच्या वडिलांचा मोठा खुलासा!