Sania Mirza | पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शोएब मलिकनं (Shoaib Malik) तिसऱ्यांदा लग्न केलं आहे. मलिकने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत तिसरे लग्न केलं आहे. सानिया मिर्झा (Sania Mirza) आणि शोएब मलिकचा (Shoaib Malik) घटस्फोट झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
शोएब मलिकनं थेट लग्न केल्याने सर्वांना धक्का बसला. यानंतर शोएब मलिकने सानियाला सोडल्याच्या चर्चा रंगू लागल्या. मात्र आता या प्रकरणी सानिया मिर्झाच्या वडिलांनी मोठा खुलासा केला आहे.
Sania Mirza च्या वडिलांचा खुलासा
यह एक ‘खुला’ था असं इम्रान मिर्झा यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं. ‘खुला’ म्हणजे इस्लाम धर्मानुसार पत्नीने नवऱ्याला सोडून देणं याला असं म्हटलं जातं. यामुळे शोएबने सानियाला नाहीतर सानियानेच शोएबला सोडून दिलं आहे, असं बोललं जात आहे.
Shoaib Malik ने केलं लग्न
शोएब मलिकची (Shoaib Malik) तिसरी पत्नी सना जावेद एक प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्री आहे. 25 मार्च 1993 मध्ये सौदी अरबमध्ये तिचा जन्म झाला. आता ती 30 वर्षांची आहे. तर, शोएबचा जन्म 1 फेब्रुवारी 1982 मध्ये सियालकोट पाकिस्तान येथे झाला. या जोडप्यात तब्बल 11 वर्षे वयाचा फरक आहे. दोघांनीही लग्न करत आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात केली आहे.
शोएब मलिकच्या दुसऱ्या लग्नाचे फोटो समोर आल्यानंतर आता सोशल मीडियावर बऱ्याच कमेंट येत आहे. बरेच जण यावर व्यक्त होत आहे. शोएब मलिकबरोबर सानिया मिर्झाला सुद्धा ट्रोल केलं जात आहे.
शोएब मलिक आणि सानिया मिर्झा 2010 मध्ये लग्नबंधनात अडकले होते. सानियाला इजहान नावाचा मुलगा आहे. गेल्या काही दिवसांपासून शोएब आणि सानियाचं बिनसलं असल्याची चर्चा आहे. तसेच त्यांचा घटस्फोट होणार असल्याच्याही चर्चा सुरू होत्या.
महत्त्वाच्या बातम्या-
Shoaib Malik | शोएब मलिकपेक्षा तब्बल ‘इतक्या’ वर्षांनी लहान आहे दुसरी पत्नी सना जावेद
PMEGP Loan | स्वतःचा व्यवसाय करायचाय?, मग फक्त आधार कार्डवर मिळवा तब्बल 10 लाखांचं लोन
Sania Mirza | ‘तुला सांगत होतो लग्न करु नको’; सोशल मीडियावर सानिया मिर्झा ट्रोल
Shoaib Malik ने ‘या’ अभिनेत्रीसाठी मोडलं सानियासोबतचं लग्न!
Post Office | पोस्टाची भन्नाट योजना; व्याजातूनच कराल बक्कळ कमाई