Shoaib Malik | शोएब मलिकपेक्षा तब्बल ‘इतक्या’ वर्षांनी लहान आहे दुसरी पत्नी सना जावेद

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Shoaib Malik | भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा (Sania Mirza) आणि पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब मलिक (Shoaib Malik) यांच्या घटस्फोटाच्या चर्चा अखेर खऱ्या ठरल्या आहेत. कारण, शोएबने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत (Sana Javed) लग्न करून सर्वांनाच धक्का दिला आहे. सना जावेदने आपल्या अधिकृत इंस्टाग्रामवर लग्नाचे फोटो पोस्ट केले आहे.

यासोबतच सनाने शोएबचे नाव देखील आपल्या नावापुढे जोडले आहे. सानिया मिर्झा आणि शोएब यांनी 12 एप्रिल 2010 मध्ये हैदराबादमध्ये ग्रँड पद्धतीने लग्न केले होते. त्यांना एक मुलगा देखील आहे. मात्र, लग्नाच्या 13 वर्षांनी दोघे वेगळे झाले आहेत. शोएबने दुसऱ्यांदा लग्न करत नवीन संसार थाटला आहे. त्याची दुसरी पत्नी सना जावेद आणि त्यांच्यात तब्बल 11 वर्षांचा फरक आहे.

शोएब आणि सनामध्ये आहे ‘इतक्या’ वर्षांचा फरक

शोएब मलिकची (Shoaib Malik) तिसरी पत्नी सना जावेद एक प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्री आहे. 25 मार्च 1993 मध्ये सौदी अरबमध्ये तिचा जन्म झाला. आता ती 30 वर्षांची आहे. तर, शोएबचा जन्म 1 फेब्रुवारी 1982 मध्ये सियालकोट पाकिस्तान येथे झाला. या जोडप्यात तब्बल 11 वर्षे वयाचा फरक आहे. दोघांनीही लग्न करत आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात केली आहे.

सना जावेदने 2012 मध्ये ‘शेहर-ए-जात’ या चित्रपटातून फिल्मी दुनियेत प्रवेश केला. यासोबतच तीने अनेक मालिकांमध्येही भूमिका केली. ‘खानी’ या रोमँटिक ड्रामानंतर ती प्रसिद्धीस आली. सनाने बेहद, शारीक-ए-हयात, दीनो की दुल्हनिया आणि आय लव यू जादा अशा लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shoaib Malik (@realshoaibmalik)

तर, शोएब मलिक (Shoaib Malik) हा पाकिस्तानसाठी क्रिकेट खेळत होता. त्याने पाकिस्तानसाठी 35 कसोटी सामन्यांमध्ये 35.15 च्या सरासरीने 1898 धावा केल्या आहेत. तर, 124 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 31.22 च्या सरासरीने 2435 धावा केल्या आहेत. पाकिस्तानसाठी शोएबने 287 एकदिवसीय सामन्यांमध्ये 34.56 च्या सरासरीने 7534 धावा केल्या आहेत.

दोन वर्षांपूर्वीच दिले होते घटस्फोटाचे  संकेत

11 नोव्हेंबर 2022 मध्ये  सानियाने इंस्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली होती. ‘ज्यांचे हृदय तुटले आहे, अशा लोकांनी कुठे जावे?’, अशी पोस्ट तीने केली होती.तेव्हापासूनच शोएब आणि तिच्यात बिनसल्याचे म्हटले गेले. तेव्हापासून शोएब (Shoaib Malik) आणि सानियाच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगत होत्या.

सानियाने बुधवारीच एक पोस्ट शेअर केली होती. ‘लग्न कठीण आहे. घटस्फोट घेणं कठीण आहे’, अशी ती पोस्ट होती. याच्या तीनच दिवसांनी म्हणजेच आज (20 जानेवारी) माध्यमांमध्ये शोएबच्या दुसऱ्या लग्नाची बातमी आली. त्यामुळे सानियाच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

News Title : Shoaib Malik and Sana Javed age difference

महत्वाच्या बातम्या- 

PPF Vs SIP, कुठे मिळेल दुप्पट परतावा, जाणून घ्या

Rashibhavishya | ‘या’ राशींनी सावध रहावं, नाहीतर होईल मोठं आर्थिक नुकसान

Ajit Pawar | बाबांनो तुम्हाला विनंती करतो एक, दोन अपत्यावर थांबा नाहीतर…- अजित पवार

Shoaib Malik | घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान शोएब मलिकनं केलं दुसरं लग्न; सर्वांनाच दिला धक्का

Petrol Diesel Price Today | पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार?, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे रेट