‘पप्पा 26 जानेवारीला डायरेक्ट…’; Manoj Jarange च्या मुलीने केलं आवाहन

Manoj Jarange | सरकारला वारंवार सांगून सुद्धा मराठा आरक्षणप्रश्नी कोणतीच ठोस भूमिका घेत नाहीेये. त्यामुळे मनोज जरांगे पाटील आंदोलन करत आहेत. दरम्यान डिसेंबर महिन्यात सरकारला मुदत देखील देण्यात आली होती. मात्र आम्हाला थोडा वेळ द्या असं सरकारने जरांगेंना सांगितलं होतं. या वेळी जरांगे म्हणाले की, पुढचं आंदोलन मी आता महाराष्ट्राच्या राजधानीत म्हणजेच मुंबईमध्ये करणार आहे.

मनोज जरांगे मुंबईकडे रवाना

मनोज जरांगेंनी (Manoj Jarange) सांगितल्या प्रमाणे मुंबईमध्ये ते पुढील आंदोलन करणार आहेत. त्यासाठी त्यांनी तयारी देखील केली आहे. मनोज जरांगेंना लाखो मराठा बांधवानी पाठिंबा दिला आहे. सध्या जरांगे अंतरवाली सराटीमधून मुंबईकडे रवाना झाले आहेत. माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटलांना आश्रू अनावर झाले.

ते म्हणाले की, “आता छातीवर गोळ्या लागल्या तरी माघार नाही. समाजासाठी मी बलिदान देण्यास तयार आहे. उपोषण 26 जानेवारीपासून करायचं होतं. त्यापेक्षा आजच का करु नये? हा विचार मी केला आहे. याबाबत समाजाला विचारुन निर्णय घेणार आहे, असं त्यांनी सांगितलं.”

जरांगेंच्या मुलीने केलं आवाहन

जरांगेंसाठी (Manoj Jarange) ही फार मोठी लढाई आहे. त्यामुळे जरांगेंना शुभेच्छा देण्यासाठी संपूर्ण जरांगे कुटुंब त्यांना भेटण्यासाठी उत्साही होते. या वेळी जरांगेंच्या तीनही मुलींनी आपल्या वडिलांना जिंकून येण्यासाठी शुभेच्छा दिल्या. “मला लहान मुलीने सांगितलं आहे की, पप्पा 26 जानेवारीला शाळेत कार्यक्रम आहे, विजय घेऊन याल तर डायरेक्ट शाळेत विजय घेऊन या.

पोरांनी सांगितलं यशस्वी होऊन या. या वेळी “माझं कुटुंब माझ्यासोबत ठाम आहे. माझं काहीही झालं तरी मी मराठा समाजासाठी लढणार आहे आणि आरक्षण मिळवणार आहे”, असं जरांगे यांनी म्हटलंय.

जरांगेंची लेकी म्हणाली की, “पप्पा नक्की आरक्षण घेऊन येतील. आम्ही पप्पांच्या कायम सोबत आहोत. पण पप्पांनी फक्त आरक्षण घेऊन यावं”, अशी प्रतिक्रिया जरांगेंच्या मुलीने दिली. “

News Title : manoj jarange daughter requested him for maratha reservation

महत्त्वाच्या बातम्या-

एकीसोबत घटस्फोट, दुसरीसोबत अफेरच्या चर्चा, तिसऱ्याच व्यक्तीसोबत Shoaib Malik ने थाटला संसार!

Sania Mirza | शोएबच्या लग्नानंतर सानिया मिर्झाच्या वडिलांचा मोठा खुलासा!

Shoaib Malik | शोएब मलिकपेक्षा तब्बल ‘इतक्या’ वर्षांनी लहान आहे दुसरी पत्नी सना जावेद

PMEGP Loan | स्वतःचा व्यवसाय करायचाय?, मग फक्त आधार कार्डवर मिळवा तब्बल 10 लाखांचं लोन

Sania Mirza | ‘तुला सांगत होतो लग्न करु नको’; सोशल मीडियावर सानिया मिर्झा ट्रोल