तिसऱ्या लग्नानंतर Shoaib Malik चा मैदानात पराक्रम; ठरला आशियातील पहिला खेळाडू

Shoaib Malik

Shoaib Malik | शोएब मलिक मागील काही दिवसांपासून खूप चर्चेत होता. पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक आणि सानिया मिर्झा विभक्त होणार असल्याच्या चर्चांना शनिवारी अखेर पूर्णविराम मिळाला. 20 जानेवारी रोजी मलिकने त्याच्या तिसऱ्या लग्नाची माहिती दिली आणि माजी टेनिस स्टार सानिया मिर्झासोबतचे नाते संपुष्टात आणले. अभिनेत्री सना जावेदसोबतच्या लग्नाची घोषणा झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच शोएब मलिकने मैदानात मोठी कामगिरी केली.

ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये मोठा विक्रम करणारा शोएब मलिका हा आशियातील पहिला फलंदाज ठरला आहे. शोएब मलिक सध्या बांगलादेश प्रीमिअर लीगमध्ये फॉर्च्युन बरीशालकडून खेळत आहे. रंगपूर रायडर्सविरूद्धच्या सामन्यात त्याने एक अनोखा ट्वेंटी-20 विक्रम आपल्या नावावर केला. या सामन्यात शोएबने 17 धावा केल्या आणि एक बळी पटकावला.

मलिकचे तिसरे लग्न

ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये 13000 धावांचा आकडा गाठणारा तो आशियातील पहिला फलंदाज ठरला आहे. आतापर्यंत आशिया खंडातील एकाही फलंदाजाला अशी कामगिरी करता आलेली नाही. या बाबतीत शोएब मलिक फक्त ख्रिस गेलच्या मागे आहे. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये गेलने 13 हजारांहून अधिक धावा केल्या आहेत.

Shoaib Malik चा मैदानात पराक्रम

ट्वेंटी-20 आंतरराष्ट्रीयबद्दल भाष्य करायचे झाले तर, मलिकच्या नावावर 124 सामन्यात 2435 धावांची नोंद आहे. दरम्यान, शोएब मलिकने आपल्या करिअरमध्ये लग्नांची हॅटट्रिक केली आहे. सना जावेदसोबत त्याने तिसरे लग्न केले. 2002 मध्ये त्याने आयशासोबत पहिले लग्न केले होते. यानंतर त्याने 2010 मध्ये आयशाला घटस्फोट दिला आणि अनेक महिने डेट केल्यानंतर सानिया मिर्झाशी लग्न केले.

 

सानिया आणि शोएब यांना लग्नाच्या 8 वर्षानंतर एक मुलगा झाला. सानिया आणि शोएबच्या विभक्त झाल्याच्या बातम्या अनेक महिन्यांपासून येत होत्या. पण शनिवारी सना जावेदसोबतच्या लग्नाची माहिती देत शोएबने आपण सानिया मिर्झापासून वेगळे झाल्याचे स्पष्ट केले आहे.

सानिया मिर्झाच्या वडिलांनी मात्र सानिया शोएबपासून वेगळी झाली असल्याचे सांगितले. सानियाने खुला दिला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एखादी स्त्री आपल्या पतीपासून वेगळी होत असेल तर त्याला खुला असे बोलले जाते. तर, पती पत्नीपासून विभक्त झाला तर त्याला तलाक असे संबोधले जाते. त्यामुळे सानिया आणि शोएब यांच्यात खुला झाला असल्याचे सानियाचे वडील इमरान मिर्झा यांनी सांगितले.

News Title- Shoaib Malik became the first Asian player to score the most runs in T20
महत्त्वाच्या बातम्या –

Ram Mandir | ‘ही’ मोठी चूक करत असाल तर सावधान! सरकारचा गंभीर इशारा

IPL 2024 चे भविष्य भारत सरकारच्या हाती! पण का? BCCI ने दिली माहिती

Sara Tendulkar अन् गिलच्या नात्याचे ‘शुभ’ संकेत; कॅमेरा दिसताच सचिनच्या लेकीनं चेहरा लपवला, VIDEO

Ram Mandir Ayodhya | 22 तारखेला बॉलिवूडलाही सुट्टी; रामललाच्या कार्यक्रमाचा उत्साह शिगेला

Sharad Pawar | 1980 ची आठवण करून देत शरद पवारांचा अजित पवारांना थेट इशारा!

 

Join WhatsApp

Join Now

संबंधित बातम्या

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .