“Pakistan चे माजी PM इम्रान खान यांनाही त्यांच्या देशात मोदींसारखा नेता हवाय”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Pakistan । अलीकडेच पार पडलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने चांगले यश मिळवले. मध्य प्रदेशात आपली सत्ता कायम राखत भाजपने काँग्रेसला चीतपट केले. पण, बहुमत मिळाल्यानंतर पक्षाने मुख्यमंत्री म्हणून मोहन यादव यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला. मोहन यादव सध्या राम मंदिराच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर धार्मिक स्थळांना भेट देत आहेत. एका सभेला संबोधित करताना त्यांनी शत्रू राष्ट्र पाकिस्तानबद्दल एक विधान केले.

मोहन यादव यांच्याकडून मोदींचे कौतुक

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी शनिवारी सांगितले की, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनाही आपल्या देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखा नेता हवा आहे. ते राजधानी भोपाळच्या आनंद नगर भागातील राम मंदिरात एका कार्यक्रमाला संबोधित करत होते. मुख्यमंत्री म्हणाले की, भारत अशा काळाचा साक्षीदार आहे, जिथे मोदी चालतात, काम करतात आणि निर्णय घेतात आणि हे सर्वकाही जग पाहत राहते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची कामगिरी पाहून केवळ आपणच नाही, शेजारी देशही हे सांगतात. पाकिस्तानसारख्या शत्रू देशाचे माजी पंतप्रधान इम्रान खान म्हणतात की मोदी त्यांचे नेते असावेत अशी माझी इच्छा आहे. ते नेहमी त्यांच्या लोकांना असे सांगत असतात. आपण मोदीजींकडून शिकले पाहिजे, असे इमरान खान म्हणतात, असा दावा मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी केला.

Pakistan च्या माजी पंतप्रधानांना मोदींसारखा नेता हवा – यादव

दरम्यान, मध्य प्रदेश सरकारने राम मंदिराच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर 22 जानेवारी रोजी शासकीय सुट्टी जाहीर केली आहे. या दिवशी राज्यातील शैक्षणिक संस्था बंद राहणार आहेत. सरकारी कार्यालयांना अर्धा दिवस तर शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मांसाची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्याबरोबरच राज्य सरकारनेही अभिषेक दिनी अंगणवाडी केंद्रांना सुट्टी जाहीर केली आहे.

मोहन यादव यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तोंडभरून कौतुक केले. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या वक्तव्याचा दाखला देत ते म्हणाले की, ‘शत्रू देश’ पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनाही आपल्या देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखा नेता हवा आहे. 17 लाख वर्षांनंतरही रामराज्य असावे, अशी भावना असल्याचेही त्यांनी नमूद केले.

22 जानेवारी हा दिवस मध्य प्रदेश सरकार राज्यभर सण म्हणून साजरा करत आहे. मंदिरांच्या स्वच्छतेसोबतच ठिकठिकाणी रामकथा, रामलीलाचे आयोजन करण्यात येत आहे. 22 जानेवारीपासून संपूर्ण राज्यात मांस विक्रीला बंदी घालण्यात आली आहे. तसेच दारूची दुकाने देखील बंद राहणार आहेत.

News Title- Madhya Pradesh Chief Minister Mohan Yadav has said that former Prime Minister of Pakistan Imran Khan wants a leader like Narendra Modi
महत्त्वाच्या बातम्या –

तिसऱ्या लग्नानंतर Shoaib Malik चा मैदानात पराक्रम; ठरला आशियातील पहिला खेळाडू

Ram Mandir | ‘ही’ मोठी चूक करत असाल तर सावधान! सरकारचा गंभीर इशारा

IPL 2024 चे भविष्य भारत सरकारच्या हाती! पण का? BCCI ने दिली माहिती

Sara Tendulkar अन् गिलच्या नात्याचे ‘शुभ’ संकेत; कॅमेरा दिसताच सचिनच्या लेकीनं चेहरा लपवला, VIDEO

Ram Mandir Ayodhya | 22 तारखेला बॉलिवूडलाही सुट्टी; रामललाच्या कार्यक्रमाचा उत्साह शिगेला