मोदींना तोंड दाखवलं नाही; लैंगिक छळाचे आरोप अन् Brijbhushan Singh यांचा खुलासा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Brijbhushan Singh | भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान भाजप खासदार ब्रीजभूषण सिंह कुस्तीपटूंच्या आरोपांनंतर वादाच्या भोवऱ्यात सापडले. मागील एका वर्षापासून नामांकित पैलवानांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले. विनेश फोगटसह इतर महिला पैलवानांनी देखील ब्रीजभूषण यांच्या राजीनाम्यासाठी धरणे आंदोलन केले होते. अनेक नाट्यमय घडामोडींनंतर अखेर कुस्ती महासंघ बरखास्त करण्यात आला. अशातच ब्रीजभूषण यांनी आता एका मुलाखतीत बोलताना एक किस्सा सांगितला आहे.

लैंगिक छळाचे आरोप अन्…

ब्रीजभूषण सिंह यांना प्रश्न विचारण्यात आला की, मागील दोन वर्षात तुमच्यावर अनेक आरोप झाले आहेत, खटला सुरू आहे, यादरम्यान तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी संवाद साधला आहे का? या प्रश्नाचे उत्तर देताना ब्रीजभूषण यांनी सावध प्रतिक्रिया दिली. ते ‘लल्लनटॉप’ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

ते म्हणाले की, माझा आणि मोदींचा कधी संवाद झाला नाही. मी त्यांना भेटलो देखील नाही. मी त्यासाठी प्रयत्नही नाही केला. पक्षाची बैठक असते तेव्हा भेटू शकलो असतो पण मीच भेट टाळली. माझा त्यांच्याशी सामना होईल असे वाटले की मी वाट बदलायचो. कारण माझ्यावर जे आरोप झाले आहेत, ते चुकीचे आहेत हे सर्वांना माहिती असले तरी मी मोदींना भेटणे टाळायचो.

Brijbhushan Singh यांचा खुलासा

तसेच प्रामाणिकपणे सांगायचे तर, मी माझ्या इच्छेप्रमाणे वागलो. मी त्यांच्यापासून दूर राहणेच पसंत केले. याला तुम्ही असे म्हणू शकता की माझ्यामुळे इतका मोठा वाद सुरू आहे आणि मी कोणत्या तोंडाने मोदींशी चर्चा करू. भलेही आरोप चुकीचे असले तरी मी मात्र मोदींना भेटणे यामुळे टाळले, असेही ब्रीजभूषण यांनी सांगितले.

भाजप खासदाराने आणखी सांगितले की, सर्वांना कल्पना आहे की हे आरोप चुकीचे आहेत. सरकारकडे सर्व तपास यंत्रणा आहे. सगळ्या बाबींची चौकशी, तपास होऊ शकतो. पण, मी असे मानतो की, जोपर्यंत माझी निर्दोष मुक्तता होत नाही तोपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सामना करणार नाही. किंबहुना त्यांची भेट घेणार नाही. या आरोपांमुळे मला त्यांची भेट घेणे योग्य वाटत नाही.

मात्र, ब्रीजभूषण सिंह यांनी गृह मंत्री अमित शहा, क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी भेट होत असल्याचे आवर्जुन सांगितले. ब्रीजभूषण यांनी महिला पैलवानांवर तसेच महिला प्रशिक्षकांचा लैंगिक छळ केला असल्याचा गंभीर आरोप भारतीय कुस्तीपटूंनी केला आहे. त्यावरून बरेच राजकारण तापले होते.

News Title- Former president of the Wrestling Federation of India and BJP MP Brijbhushan Singh said that he has not met Prime Minister Narendra Modi since the sexual harassment allegations against him
महत्त्वाच्या बातम्या –

Pakistan चे माजी PM इम्रान खान यांनाही त्यांच्या देशात मोदींसारखा नेता हवाय – मुख्यमंत्री

तिसऱ्या लग्नानंतर Shoaib Malik चा मैदानात पराक्रम; ठरला आशियातील पहिला खेळाडू

Ram Mandir | ‘ही’ मोठी चूक करत असाल तर सावधान! सरकारचा गंभीर इशारा

IPL 2024 चे भविष्य भारत सरकारच्या हाती! पण का? BCCI ने दिली माहिती

Sara Tendulkar अन् गिलच्या नात्याचे ‘शुभ’ संकेत; कॅमेरा दिसताच सचिनच्या लेकीनं चेहरा लपवला, VIDEO