मुंबई | अयोध्येतील राम मंदिरात (Ram Mandir) रामलल्लाची मूर्ती विराजमान झाली असून 22 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते त्याची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या सोहळ्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. तसेच प्रभू राम मंदिराच्या उद्घाटनासाठी अनेक राज्यांमध्ये सुटी जाहीर करण्यात आली आहे. केंद्र सरकारने 22 जानेवारी रोजी केंद्रीय संस्था आणि इतर केंद्रीय औद्योगिक आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांना अर्धा दिवस सुट्टी देण्याची घोषणा केली आहे.
22 जानेवारीला काय बंद काय चालू?
संपूर्ण देशात राम मंदिराच्या उद्घाटनाचा उत्साह पाहायला मिळत. अनेक राज्यांमधील शाळा-कॉलेजांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्याचबरोबर मांस आणि दारूची दुकानंही बंद राहतील. सरकारी आदेशानुसार सोमवारी म्हणजेच 22 जानेवारीला कसिनो उघडणार नाहीत.
दिल्लीच्या एम्सने आदेश जारी केला आहे की, 22 जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजेपर्यंत ओपीडी सुविधा उपलब्ध होणार नाही. जर एखाद्या व्यक्तीला अपघात झाला आणि आपत्कालीन परिस्थितीत रुग्णालयात नेले गेले तर त्याच्यावर उपचार केले जातील.
22 जानेवारी रोजी मध्य प्रदेशातील शहरी भागात सर्व कत्तलखाने आणि मांस विक्रीची दुकानं बंद राहतील. मध्य प्रदेशातील सर्व सरकारी कार्यालयांना अर्धा दिवस सुट्टी असेल. सर्व शासकीय कार्यालये दुपारी अडीच वाजेपर्यंत बंद राहणार आहेत.
Ram Mandir | सर्व शाळा-कॉलेजला सुट्टी
उत्तर प्रदेशात सर्व शाळा-कॉलेजला सुट्टी असेल, तसेच मांस विक्री करणारी दुकानंही बंद राहतील. गोव्यात सर्व शाळा बंद असतील. कार्यालयांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर हरियाणात 22 जानेवारीला शाळांना सुट्टी असेल. ओदिशातही सरकारने हाफ डेची घोषणा केली आहे. गुजरातमध्येही 22 जानेवारीला अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
दरम्यान, पंतप्रधान अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन करणार असून ते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणेही असतील. या कार्यक्रमाला 7,000 हून अधिक लोक उपस्थित राहणार आहेत, ज्यात राजकारणी, चित्रपट क्षेत्रातील व्यक्ती, आघाडीचे उद्योगपती आणि इतरांचा समावेश आहे. गोव्यातील राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी पूर्ण दिवस सुट्टीची घोषणा केलीय. गोव्यात सर्व दारू आणि भांग दुकान बंद राहतील.
महत्त्वाच्या बातम्या-
Rashmika Mandanna च्या डिपफेक प्रकरणी सर्वात मोठी माहिती समोर!
Amruta Fadnavis | अमृता फडणवीस यांनी केली मोठी घोषणा, म्हणाल्या ‘लवकरच…’
मोदींना तोंड दाखवलं नाही; लैंगिक छळाचे आरोप अन् Brijbhushan Singh यांचा खुलासा
“Pakistan चे माजी PM इम्रान खान यांनाही त्यांच्या देशात मोदींसारखा नेता हवाय”
तिसऱ्या लग्नानंतर Shoaib Malik चा मैदानात पराक्रम; ठरला आशियातील पहिला खेळाडू