Plane crashed in Afghanistan | सर्वात मोठी बातमी! मॉस्कोला जाणारं विमान अफगाणिस्तानात कोसळलं

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Plane crashed in Afghanistan | अफगाणिस्तानच्या बदख्शान खान भागात विमान कोसळल्याची (plane crashed in Afghanistan )बातमी समोर आली आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या मीडिया हाऊसने ते भारतीय विमान असल्याची माहिती दिली होती. मात्र, नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने हे विमान भारताचे नसल्याचे सांगितले.

मॉस्कोला जाणारं विमान अफगाणिस्तान कोसळलं

हे विमान उत्तर आफ्रिकेतील मोरोक्क्याचं होतं. या विमानात भारतीय प्रवाशी होते का? याची माहिती घेतली जात आहे. मोरोक्कोमध्ये नोंदणीकृत हे छोटे विमान आहे.

अफगाणिस्तानच्या बदख्शान प्रांतात हा अपघात झाला. हे विमान काल रात्री रडारवरून गायब झालं होतं. यानंतर जिबाक जिल्ह्यातील डोंगराळ भागात ते कोसळले. विमानात किती प्रवासी होते याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

Plane crashed in Afghanistan | कोसळलेलं विमान भारतीय नाही

या दुर्घटनेचं कारण अद्याप समोर आलेली नाही. अफगाणिस्तानी मीडियाने विमान अपघाताची माहिती दिली आहे. एएनआय वृत्तसंस्थेने टोलो न्यूजच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.

पाकिस्तानी मीडिया हाऊसने बदख्शान प्रांताच्या पोलीस कमांडच्या हवाल्याने माहिती दिली होती की, विमान काल रात्री रडारवरून गायब झालं होतं. यानंतर जेबक जिल्ह्यातील डोंगराळ भागात ते कोसळलं.

दुपारी 12.45 वाजता अफगाण मीडियाच्या हवाल्याने हे विमान भारताचं होतं, जे मॉस्कोला जात होतं. मात्र अर्ध्या तासात पुन्हा माहिती आली की हे भारतीय प्रवासी विमान नाही. खरं तर अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता आल्यापासून त्यांच्या हवाई हद्दीतून एकही भारतीय विमान उडत नाही.

महत्त्वाच्या बातम्या- 

Rashmika Mandanna च्या डिपफेक प्रकरणी सर्वात मोठी माहिती समोर!

Amruta Fadnavis | अमृता फडणवीस यांनी केली मोठी घोषणा, म्हणाल्या ‘लवकरच…’

मोदींना तोंड दाखवलं नाही; लैंगिक छळाचे आरोप अन् Brijbhushan Singh यांचा खुलासा

“Pakistan चे माजी PM इम्रान खान यांनाही त्यांच्या देशात मोदींसारखा नेता हवाय”

तिसऱ्या लग्नानंतर Shoaib Malik चा मैदानात पराक्रम; ठरला आशियातील पहिला खेळाडू