Team India | जय श्री राम…! भारतीय खेळाडूचं शतक प्रभू श्री रामाला समर्पित

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Team India | भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला 25 जानेवारीपासून सुरूवात होत आहे. टीम इंडिया मायदेशात इंग्लिश संघाविरूद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेला सुरूवात होण्याआधीच भारतीय शिलेदाराने शतक झळकावून सज्ज असल्याचे संकेत दिले. यष्टीरक्षक फलंदाजाने शतक झळकावून मोठ्या वादाला पूर्णविराम दिल्याचे दिसते. 30 वर्षीय भारतीय खेळाडूने शतक झळकावल्यानंतर शतकी खेळी प्रभू श्री रामाला समर्पित केली.

इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या दोन सामन्यांसाठी टीम इंडियाने संघ जाहीर केला आहे, ज्यामध्ये तीन यष्टीरक्षक फलंदाजांना संधी देण्यात आली आहे. लोकेश राहुल, केएस भरत आणि युवा ध्रुव जुरेलला संधी मिळाली. मात्र पहिल्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला संधी मिळते हे पाहण्याजोगे असेल. अशातच केएस भरतने शतक झळकावून आपला दावा मजबूत केला.

भरतचं शतक प्रभू श्री रामाला समर्पित

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी शतक झळकावल्यानंतर केएस भरतने ते प्रभू श्री रामाला समर्पित केले आहे. या शतकासह त्याने मोठा वाद देखील संपवल्याचे दिसते. हा वाद टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनशी संबंधित आहे. कारण या शतकी खेळीमुळे भरतला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघात तीन यष्टीरक्षक फलंदाजांची निवड करण्यात आली आहे.

Team India चा शिलेदार ‘भारत अ’ कडून चमकला

दरम्यान, भारत अ संघाकडून इंग्लंड लायन्सविरुद्ध खेळताना केएस भरतने शतक झळकावले. केएस भरतने 165 चेंडूंचा सामना करत 15 चौकारांच्या मदतीने 116 धावा केल्या. त्याच्या शतकानंतर इंग्लंड लायन्स आणि भारत अ यांच्यातील कसोटी सामना अनिर्णित राहिला. शतक झळकावताच भरतने प्रभू श्री रामाला ही शतकी खेळी समर्पित केली.

 

केएस भरतने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो रामललाला शतकी खेळी समर्पित करताना दिसतो. तसेच कॅप्शनमध्ये देखील त्याने ‘जय श्री राम’ असा उल्लेख केला आहे. या शतकी खेळीमुळे भरतची भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये वर्णी लागण्याची शक्यता वाढली आहे.

पहिल्या दोन सामन्यांसाठी भारताचे शिलेदार –

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह आवेश खान.

News Title- indian batter KS Bharat dedicated a century to Lord Sri Rama
महत्त्वाच्या बातम्या –

Mira Road Riots | सनातन यात्रेवर हल्ला! श्री रामाचे झेंडे फाडले; तणावानंतर मोठा पोलीस बंदोबस्त

Ram Mandir | प्राण प्रतिष्ठा कार्यक्रम अन् ‘दिवाळी’! बाजारात 1 लाख कोटींहून अधिकची उलाढाल

“तो आमच्या जमान्यात असता तर…”, Shoaib Akhtar ला विराटच्या क्षमतेवर शंका

Ram Mandir | स्वप्नपूर्ती! साक्षात रामलला आज घरी आले; बाळाला जन्म दिलेल्या महिलांची भावना

Virat Kohli ची अयोध्येत एन्ट्री! रस्त्यावर जमली एकच गर्दी, Video Viral