Ram Mandir | “नरेंद्र मोदींसारखा हिंदूंचं समर्थन करणारा पंतप्रधान अजूनपर्यंत झाला नाही”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ram Mandir | शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी प्रभु श्रीरामाच्या अभिषेक कार्यक्रमाला येण्यास नकार दिला होता. काही दिवसांपूर्वीच त्यांनी  आपल्या वक्तव्यात यू-टर्न घेतला आहे. त्यांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करण्यात आले. राम मंदिर (Ram Mandir) प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला विरोध केलता. आता मात्र शंकराचार्य अविमुक्तेश्वर यांचे सूर बदलले आहे.

राम मंदिर (Ram Mandir) प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासंदर्भात ज्योतिष पीठ के शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी प्रश्न उपस्थित केले होते. शंकराचार्य अविमुक्तेश्वर यांनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला विरोध केला होता. आता त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)यांचं कौतूक केलं आहे.

शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी केलं मोदींचं कौतुक

मी अनेकवेळा सरकारचं कौतूक केलं आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर हिंदूच्या स्वाभिमान जागृत झाला आहे. नरेंद्र मोदी यांचा सारखा हिंदूंचे समर्थन करणारा पंतप्रधान अजूनपर्यंत झाला नाही, असं ते म्हणालेत.

Ram Mandir | “मोदींसारखा पंतप्रधान अजूनपर्यंत झाला नाही”

मोदी यांनी कलम 370 रद्द केलं. तेव्हा मी त्याचं स्वागत केलं होतं. सामान नागरी कायद्याचे आम्ही समर्थन नाही करत का? श्रीराम जन्मभूमीचा निर्णय आल्यानंतर सरकारने ज्या प्रकार परिस्थिती हाताळली आम्ही त्याचं कौतूक केलं नव्हतं का? जेव्हा, जेव्हा हिंदू भावांना बळ मिळतो, तेव्हा आम्हाला आनंद होतो, असं शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी म्हटलं.

मी यापूर्वी अनेक वेळा सांगितलं आहे की मी मोदीविरोधी नाही. मी नेहमी त्यांचं कौतूक केलं आहे. कारण हिंदूंची बाजू इतक्या ठामपणे मांडणारा अजून एकही पंतप्रधान झाला नाही. मी इतर कोणावर टीका करत नाही. पण मोदींची विशेषता मान्य करावी लागणार आहे, असंही त्यांनी म्हटलंय.

दरम्यान, शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं की, अर्धवट राहिलेल्या मंदिरात देवाची प्रतिष्ठापना करणं धार्मिक नाही. मी पीएम मोदींचा हितचिंतक आहेत, म्हणून मी शास्त्रानुसार काम करण्याचा सल्ला देत आहे. प्रचलित परिस्थिती लक्षात घेता 1992 मध्ये कोणताही शुभ मुहूर्त न लावता रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. मात्र सध्या परिस्थिती अनुकूल आहे. अशा परिस्थितीत योग्य क्षणाची आणि वेळेची वाट पाहिली पाहिजे, असं ते म्हणाले होते.

महत्त्वाच्या बातम्या- 

Ram Mandir Inauguration Day | अवधपुरी झाली राममय; सोहळ्यासाठी भल्या पहाटे ‘हे’ स्टार्स अयोध्येत दाखल

Team India | जय श्री राम…! भारतीय खेळाडूचं शतक प्रभू श्री रामाला समर्पित

Mira Road Riots | सनातन यात्रेवर हल्ला! श्री रामाचे झेंडे फाडले; तणावानंतर मोठा पोलीस बंदोबस्त

Ram Mandir | प्राण प्रतिष्ठा कार्यक्रम अन् ‘दिवाळी’! बाजारात 1 लाख कोटींहून अधिकची उलाढाल

“तो आमच्या जमान्यात असता तर…”, Shoaib Akhtar ला विराटच्या क्षमतेवर शंका