Ram Mandir Pran Pratishtha | पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) च्या हस्ते विधिवत पूजा करुन रामलल्ला यांची प्रतिष्ठापना (Ram Mandir Pran Pratishtha) करण्यात आली. या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्याचं भाग्य अनेक रामभक्तांना घरबसल्या मिळालं. आज आपले राम आलेत. आमचे रामलल्ला आता दिव्य मंंदिरात राहतील, असं नरेंद्र मोदी यावेळी बोलताना म्हणालेत.
अयोध्येत नरेंद्र मोदींच्या भावना
शतकाच्या प्रतिक्षेनंतर आपले राम आले आहेत. शतकाच्या अभूतपूर्व धैर्य अगणित बलिदान त्याग आणि तपस्येनंतर आपले प्रभू राम आले आहेत. या शुभ प्रसंगाची आपल्या सर्वांना, संपूर्ण देशाला शुभकामना. अभिनंदन, असं नरेंद्र मोदी सुरुवातीला म्हणाले.
आपले रामलल्ला आता तंबूत राहणार नाहीत, दिव्य मंदिरात राहणार आहेत. माझा पक्का विश्वास आहे, अपार श्रद्धा आहे, विश्वाच्या कानाकोपऱ्यात रामभक्तांना याची अनुभूती आली असेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
Ram Mandir Pran Pratishtha | “रामलल्ला आता दिव्य मंदिरात राहणार”
या शुभ घडीच्या सर्व देशवासीयांना खूप शुभेच्छा. किती सारं सांगण्यासारखं आहे. पण कंठ नि:शब्द झालाय. माझं शरीर अजूनही स्तब्ध आहे. चित्त अजूनही त्या क्षणात लीन आहे, असं मोदींनी म्हटलंय.
22 जानेवारी 2024 चा हा सूर्य एक अद्भूत दिवस घेऊन आला आहे. ही कॅलेंडरवरील एक तारीख नाही तर एक नव्या काळाचा उगम आहे, असा विश्वास नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील भव्य आणि ऐतिहासिक राम मंदिरात रामलल्लांची विधीवत पूजा करण्यात आली. 500 वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर राम मंदिरात रामलल्लांची मूर्ती विराजमान झाली. पूजेवेळी रामलल्लांच्या गर्भगृहात पंतप्रधान मोदींसह सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या-
Stock Market | प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित शेअर बाजार बंद; ‘या’ दिवशी होणार पुन्हा सुरू
Ram Mandir | अयोध्या टेंट सिटीत फाईव्ह स्टार हॉटेलसारख्या सुविधा; व्हिडीओ तूफान व्हायरल
Ram Mandir | “नरेंद्र मोदींसारखा हिंदूंचं समर्थन करणारा पंतप्रधान अजूनपर्यंत झाला नाही”