Ram Mandir Pran Pratishtha | बॉलिवूडचे तिन्ही खान प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापासून वंचित; ‘या’ स्टार्सला नाही मिळालं निमंत्रण

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ram Mandir Pran Pratishtha | संपूर्ण देशाला प्रतिक्षा असलेला सोहळा अखेर आज पार पडत आहे. अयोध्येत तब्बल 500 वर्षांनी प्रभू श्रीराम परतणार आहेत. अयोध्येतील भव्य मंदिरात आज (22 जानेवारी) श्रीराम विराजणार आहेत. या सोहळ्यासाठी अनेक कलाकारांना निमंत्रित करण्यात आले आहे. मात्र, काही मोठ्या स्टार्सला याचे निमंत्रण देण्यात आले नाही.

यात तिन्ही खान यांचा समावेश आहे. सोबतच काही मोठे कलाकारांचीही यात समावेश आहे. त्यामुळे याचीही सध्या एकच चर्चा रंगत आहेत. तर, दुसरीकडे अभिनेते अमिताभ बच्चन, रणबीर कपूर, रजनीकांत यांच्यासह अनेक स्टार्स अयोध्येकडे रवाना झाले आहेत.

‘या’ स्टार्सला नाही मिळालं निमंत्रण

काही मिडिया रिपोर्टसनुसार सोहळ्याला (Ram Mandir Pran Pratishtha) अभिनेता शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान यांना सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलं नाही. यामागील कारण, अद्याप समोर आले नाही. यासोबतच अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि तिचा पती अभिनेता रणवीर सिंह यांनाही निमंत्रण देण्यात आले नाही.

यासोबतच सैफ अली खान आणि करीना कपूर यांचाही यात समावेश नाही. त्यामुळे ही कलाकार अयोध्येत होणाऱ्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होणार नाहीत. दुसरीकडे अभिनेत्री कंगना रनौत सोहळ्यासाठी कालच अयोध्येत पोहोचली. तीने हनुमान गढीवर साफ-सफाई देखील केली. तिचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय.

‘या’ स्टार्सला मिळाल निमंत्रण

अभिनेता विकी कौशल आणि कॅटरिना कैफ, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट, रणदीप हुड्डा व त्याची पत्नी लीन तसेच माधुरी दीक्षित व तिचे पती श्रीराम नेने, बिग-बी अमिताभ बच्चन, रजनीकांत यांच्यासह साऊथच्या काही स्टार्सलाही सोहळ्याचे (Ram Mandir Pran Pratishtha) निमंत्रण देण्यात आले आहे.

क्रिकेट जगतातीलही अनेक दिग्गजांना याचे निमंत्रण देण्यात आले आहे. आज पहाटेच अनुष्का शर्मा आणि विराट कोहली अयोध्येसाठी रवाना झाले आहेत. माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर अयोध्येला जाण्यापूर्वी विमानतळावर दिसून आला. तर अनिल कुंबळेही कालच अयोध्येत पोहोचले आहेत. आज दुपारी साडे बारा वाजता या सोहळ्याला सुरुवात होणर आहे.

News Title- Ram Mandir Pran Pratishtha ceremony

महत्त्वाच्या बातम्या –

Team India | जय श्री राम…! भारतीय खेळाडूचं शतक प्रभू श्री रामाला समर्पित

Mira Road Riots | सनातन यात्रेवर हल्ला! श्री रामाचे झेंडे फाडले; तणावानंतर मोठा पोलीस बंदोबस्त

Ram Mandir | प्राण प्रतिष्ठा कार्यक्रम अन् ‘दिवाळी’! बाजारात 1 लाख कोटींहून अधिकची उलाढाल

“तो आमच्या जमान्यात असता तर…”, Shoaib Akhtar ला विराटच्या क्षमतेवर शंका

Ram Mandir | स्वप्नपूर्ती! साक्षात रामलला आज घरी आले; बाळाला जन्म दिलेल्या महिलांची भावना