Stock Market | प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित शेअर बाजार बंद; ‘या’ दिवशी होणार पुन्हा सुरू

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Stock Market | राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित महाराष्ट्रासह देशातील काही राज्यात सुट्टी तर कुठे हाल्फ डे देण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांच्या भावना लक्षात घेत केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना सोहळ्यात सहभागी होता यावे, म्हणून अर्धा दिवस सुट्टी दिली आहे. आता याच पार्श्वभूमीवर शेअर बाजारालाही (Stock Market ) आज (22 जानेवारी) सुट्टी असणार आहे.

आता मंगळवारी (23 जानेवारी) पुन्हा ट्रेडिंगला सुरुवात होईल. आज इक्विटी मार्केटसोबतच NCDEX आणि MCX सुद्धा बंद असणार आहे. 20 जानेवारी रोजी सेन्सेक्स 259 अंकांनी घसरला आणि 71,423 वर बंद झाला होता. आता इक्विटी मार्केटमध्ये मंगळवारी व्यवहार होणार आहेत.

‘या’ दिवशी ट्रेडिंग पुन्हा सुरू होणार

गेल्या आठवड्यात शेअर मार्केट (Stock Market) खाली आले होते. पाच दिवसांत सेन्सेक्स 1150 अंकांनी घसरला होता. आजच्या सुट्टीमुळे आता उद्याच ट्रेडिंग करता येणार आहे. यासोबतच जानेवारी महिन्यात अजून काही सुट्ट्या असणार आहेत. प्रजासत्ताक दिनी म्हणजेच 26 जानेवारीला देखील शेअर मार्केट बंद असेल. त्यानंतर थेट 8 मार्चला महाशिवरात्रीला सुट्टी असेल.

देशात राम मंदिर सोहळ्यामुळे संपूर्ण वातावरण धार्मिक झाले आहे. अयोध्या प्रभू रामाच्या स्वागतासाठी सजली आहे. आज महाराष्ट्रातील सर्व शासकीय, निमशासकीय तसेच शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. तर, देशातील काही राज्यांत केंद्रीय कर्मचाऱ्यांना अर्ध्या दिवसाची सुट्टी देण्यात आली आहे.

प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे लाईव्ह प्रसारण पाहता येणार

आज दुपारी 12 वाजून 29 मिनट 8 सेकंदच्या मुहूर्तावर अयोध्येत कार्यक्रम होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सोहळ्याचे प्रमुख असणार आहेत. प्राण प्रतिष्ठा सोहळा तुम्ही घरी बसूनही लाईव्ह बघू शकणार आहात. याचे थेट प्रसारण डीडी न्यूज़ (DD News) वर दाखवण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी विविध जागेवर एकूण 40 ठिकाणी कॅमेरा लावण्यात आले आहेत. त्यामुळे संपूर्ण देशवासीय कार्यक्रमाचा लाईव्ह आनंद घेऊ शकतील. आज शेअर बाजार (Stock Market) बंद असल्याने ट्रेडिंग करणारेही सोहळ्याचा आनंद घेतील.

आज प्राण प्रतिष्ठापणा सोहळ्यासाठी सर्व पाहुणे सकाळी साडेदहा वाजेपर्यंत कार्यक्रमस्थळी प्रवेश करू शकतील. तर, देशाचे पंतप्रधान मोदी सकाळी 10.25 च्या सुमारास अयोध्येतील वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचतील. आज अभिजीत मुहूर्तावर नवीन मंदिरात रात्री 12:29 ते 12:30 च्या दरम्यान प्रभू रामाचा अभिषेक केला जाईल. या अभिजीत मुहूर्ताच्या 84 सेकंदात सर्व धार्मिक विधी पार पडणार आहेत.

News Title- Stock Market Holiday for Ram Mandir Inauguration 

महत्त्वाच्या बातम्या –

Team India | जय श्री राम…! भारतीय खेळाडूचं शतक प्रभू श्री रामाला समर्पित

Mira Road Riots | सनातन यात्रेवर हल्ला! श्री रामाचे झेंडे फाडले; तणावानंतर मोठा पोलीस बंदोबस्त

Ram Mandir | प्राण प्रतिष्ठा कार्यक्रम अन् ‘दिवाळी’! बाजारात 1 लाख कोटींहून अधिकची उलाढाल

“तो आमच्या जमान्यात असता तर…”, Shoaib Akhtar ला विराटच्या क्षमतेवर शंका

Ram Mandir | स्वप्नपूर्ती! साक्षात रामलला आज घरी आले; बाळाला जन्म दिलेल्या महिलांची भावना