Ram Mandir | ‘याची देही याची डोळा, ऐसा देखिला सोहळा’; प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर श्रीराम यांच्या मूर्तीचं पहिलं दर्शन

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ram Mandir | अयोध्येतील प्रभू रामचंद्र यांच्या 500 वर्षांचा वनवास आज संपला. दुपारी 12.29 मिनिटांनी रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. देशातील कोट्यावधी भाविकांनी घरबसल्या प्रभूरामचे दर्शन घेतलं.

Ram Mandir

 

प्राणप्रतिष्ठेसाठी 84 सेंकदाचा मुहूर्त 12 वाजून 29 मिनिटांनी होता. यावेळी मंदिर परिसरात (Ram Mandir) विमानातून पुष्पवृष्टी करण्यात आली. शंखनिनाद करण्यात आला. भक्तीमय वातावरणात प्रभू श्रीरामच्या जयघोषात प्राणप्रतिष्ठा झाली.

Ram Mandir 1 5

पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रमुख उपस्थितीत प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला.

Ram Mandir 4

गेल्या अनेक दिवसांपासून देशवासियांनी राम मंदिर (Ram Mandir) प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची प्रतिक्षा होती. हा सोहळा अनेक अर्थांनी महत्वपूर्ण होता. अयोध्येत सोहळ्यासाठी फक्त निमंत्रितानाच बोलवण्यात आलं होतं.

Ram Mandir

 

अमिताभ बच्चन, रजनीकांत, उद्याोजक मुकेश अंबानी आणि गौतम अदानी, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्यासह देशभरातील शेकडो मान्यवर आणि साधुसंतांच्या साक्षीने रामजन्मभूमीवरील नव्या मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला.

Ram Mandir 3

रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या विधीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मूर्तीसमोर साष्टांग दंडवत प्रणाम केला. या ऐतिहासिक क्षणांसाठी केवळ अयोध्याच नव्हे, तर सगळा देश सजला आहे. देशभरात रामभक्तीचे वातावरण आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

Stock Market | प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित शेअर बाजार बंद; ‘या’ दिवशी होणार पुन्हा सुरू

Ram Mandir Pran Pratishtha | बॉलिवूडचे तिन्ही खान प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापासून वंचित; ‘या’ स्टार्सला नाही मिळालं निमंत्रण

Ram Mandir | अयोध्या टेंट सिटीत फाईव्ह स्टार हॉटेलसारख्या सुविधा; व्हिडीओ तूफान व्हायरल

Ram Mandir | “नरेंद्र मोदींसारखा हिंदूंचं समर्थन करणारा पंतप्रधान अजूनपर्यंत झाला नाही”

Ram Mandir Inauguration Day | अवधपुरी झाली राममय; सोहळ्यासाठी भल्या पहाटे ‘हे’ स्टार्स अयोध्येत दाखल