Atal Setu Accident | मुंबईतील ‘अटल सेतू’ वर पहिला खतरनाक अपघात; व्हिडीओ पाहून उडेल थरकाप

Atal Setu Accident | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 12 जानेवारी रोजी केलेल्या देशातील सर्वात मोठ्या सागरी पुलाचं उद्घाटन होऊन काहीच दिवस होत नाही तोच यावर पहिला अपघात झाला आहे. ‘अटल सेतू’ वर एका कारचा भीषण (Atal Setu Accident ) अपघात झाला असून त्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

ही कार भरधाव वेगाने जात असतानाच नियंत्रण सुटून ती डिव्हायडरवर जाऊन जोरात धडकली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, याचा व्हिडीओ पाहून थरकाप उडेल असा हा अपघात झाला आहे. त्यामुळे कारचालकांनी सावधानता बाळगूनच गाडी चालवावी, असा इशारा देण्यात येत आहे.

…असा झाला अपघात

नवीन अटल सेतुवर एक चालक व्हिडिओ बनवत होता. त्याचवेळी मागून डाव्या बाजूने एक मारूती इग्निस कार भरधाव वेगाने पुढे जाऊन उलटी पलटी झाली. पुढे ती कार डिव्हायडरला जोरात जाऊन धडकते. हा अपघात बघून काही कारचालक पुढे निघून जातात. मात्र, हा व्हिडिओ बनवणारा चालक पुढे जाऊन थांबून परत त्या कारकडे जातो.

या अपघातात (Atal Setu Accident ) कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, कारचे बरेच नुकसान झाले आहे. हा व्हिडिओ सोशल मिडियावर पोस्ट होताच वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. सोशल मिडियावर आता हा पूल सेल्फी पॉईंट, पिकनीक पॉईंट बनल्याचीही टीका होत आहे.

‘अटल सेतू’ पूलाची वैशिष्ट्ये-

दक्षिण मुंबईतील शिवडी ते नवी मुंबईतील न्हावा शेवापर्यंत जाणयासाठी तब्बल दोन तसंच प्रवास करावा लागत होता. मात्र आता अटल सेतू या सागरी पुलामुळे (Atal Setu Toll) हा प्रवास अगदी 20 ते 22 मिनिटांमध्ये पार करता येणार आहे. या सागरी पुलाचा एकूण खर्च 21 हजार कोटींच्या पुढे गेला आहे.

अटल सेतू पुलाची लांबी 21.80 किलोमीट एवढी आहे. तसेच या सहा पदरी मार्गाचा 16.5 किलोमीटरचा भाग सागरी सेतूने व्यापला आहे, तर 5.5 किलोमीटरचा भाग हा जमिनीवर आहे. या पूलावरून जाण्यासाठी वेगवेगळ्या वाहनांना वेगवेगळा टोल लावण्यात आला आहे. यासोबतच अटल सेतूवर अनेक उच्च तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. शॉक ॲबझॉर्बर म्हणून काम करणाख्या आयसोलेशन बेअरिंगचा अटल सेतूवर वापर करण्यात आला आहे. यामुळे भूकंप झाला तरी हा पूल तुटणार नाही, फक्त थोडा हादरू शकतो. तसेच, पुलावर इको-फ्रेंडली दिवे देखील लावण्यात आले आहेत. आता या अपघातामुळे (Atal Setu Accident ) हा पूल चर्चेत आला आहे.

News Title-  Atal Setu Accident

महत्त्वाच्या बातम्या –