Bollywood | तब्बल 500 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर अखेर तो क्षण आला अन् रामलला आपल्या अयोध्येतील भव्य मंदिरात विराजमान झाले. सोमवारी मोठ्या उत्साहात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भव्य राम मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. प्रभू श्री रामाची झलक अयोध्येतील भव्य मंदिरात दिसावी अशी कोट्यवधी रामभक्तांची इच्छा होती जी पूर्ण झाली. राम मंदिराच्या निर्माणासाठी अनेकांनी भरघोस मदत केली. देणगीतून भव्य राम मंदिराची उभारणी करण्यात आली आहे.
22 जानेवारीला अयोध्येच्या राम मंदिरात भगवान श्रीरामाचा अभिषेक सोहळा पार पडला. विविध क्षेत्रातील दिग्गज या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी अयोध्येला पोहचले होते. बॉलिवूड कलाकारांनी देखील अयोध्या गाठून श्री रामाचे दर्शन घेतले. प्रभू राम मंदिराच्या उभारणीसाठी अनेक बॉलिवूड स्टार्सनी योगदान दिले आहे.
राम मंदिरासाठी कलाकार सरसावले
होय, हॉलिवूडपासून साऊथपर्यंत अनेक सेलिब्रिटींनी मंदिराच्या बांधकामासाठी देणगी दिली आहे. मंदिरासाठी देणगी देणाऱ्या या यादीत पहिले नाव आहे ते बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचे. 2021 मध्ये एक व्हिडीओ शेअर करून त्याने सर्व देशवासीयांना राम मंदिराच्या उभारणीसाठी देणगी देण्याचे आवाहन केले होते. आपण आपले योगदान दिल्याचेही त्याने सांगितले होते. मात्र, ही रक्कम अक्षय कुमारने उघड केली नाही.
ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी यांनीही राम मंदिरासाठी देणगी स्वरूपात योगदान दिले आहे. त्यांनी देखील ही रक्कम गुप्त ठेवली आहे. दरम्यान, अनुपम खेर यांनी मंदिराच्या बांधकामासाठी विटा दान केल्या आहेत. अनुपम खेर शनिवारीच रामाची नगरी अयोध्येत पोहोचले होते. अयोध्येला पोहोचण्यापूर्वी त्यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट केली होती.
Bollywood कलाकारांकडून भरघोस दान
ज्येष्ठ अभिनेते मुकेश खन्ना यांनीही राम मंदिरासाठी योगदान दिले आहे. याची माहिती त्यांनी स्वतः सोशल मीडियावर दिली आहे. त्यांनी 1.11 लाख रुपयांची देणगी दिली आहे. तसेच दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेते पवन कल्याण यांनी देखील राम मंदिरासाठी देणगी दिली आहे. मंदिराच्या बांधकामासाठी अभिनेत्याने 30 लाख रुपयांची देणगी दिली आहे.
अभिनेता गुरमीत चौधरीनेही राम मंदिराच्या उभारणीसाठी मोठे योगदान दिले आहे. त्यांने स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. त्याने पोस्टद्वारे सांगितले होते की, राम मंदिराच्या उभारणीच्या कामासाठी निधी गोळा करण्याचे काम संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात सुरू आहे. या शुभ कार्यासाठी मी प्रभू रामाच्या चरणी माझ्याकडूनही काही सहकार्य अर्पण करू इच्छितो.
News Title- Some Bollywood actors have donated to the grand Ram temple in Ayodhya
महत्त्वाच्या बातम्या –
Ram Mandir Ayodhya | “मोदी आणि योगी यांची जोडी म्हणजे जणू राम-लक्ष्मण”
Maharashtra politics | महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी समोर!
Congress | मोठी बातमी! काँग्रेसचा ‘हा’ बडा नेता तडकाफडकी निलंबित
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खान अचानक रूग्णालयात अॅडमिट; चाहते चिंतेत, नेमकं काय झालं?
Bigg Boss 17 | ‘बिग बॉस’च्या फिनालेपूर्वी अंकिता लोखंडेला मोठा धक्का!