Ram Mandir Ayodhya | “मोदी आणि योगी यांची जोडी म्हणजे जणू राम-लक्ष्मण”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ram Mandir Ayodhya | संपूर्ण देशाचं लक्ष लागलेला सोहळा अखेर पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (22 जानेवारी) अयोध्येमध्ये प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. यावेळी नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासह आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) उपस्थित होते.

आज आभूषणांनी, फुलांनी व तुळशीच्या पानांनी सजवलेली, पिवळी वस्त्रे धारण केलेली श्रीरामांची पहिली झलक पाहायला मिळाली आणि संपूर्ण देशाला राम मुखाचे दर्शन झाले. यावेळी देशभरातील प्रमुख दिग्गज उपस्थित होते. तसेच कलाकारदेखील सोहळ्याला उपस्थित होते. यावेळी एका साऊथ अभिनेत्याने थेट मोदी आणि योगी यांची ‘राम-लक्ष्मण’शीच तुलना केली. हे वक्तव्य सध्या चर्चेत येत आहे.

मोदी आणि योगी यांची ‘राम-लक्ष्मण’शी तुलना

साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध अभिनेते सुमन तलवार (Suman Talwar) राम मंदिराच्या (Ram Mandir Ayodhya) अभिषेक सोहळ्यात सहभागी होण्यासाठी अयोध्येत पोहोचले. त्यांनी आपल्या पहिल्या अयोध्या भेटीबद्दल उत्साह व्यक्त केला आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं कौतुक देखील केलं.

देशात आज सगळीकडे राममय वातावरण झाले आहे. मला असे वाटते की, हे काम पूर्ण करण्यासाठी प्रभू रामांनी नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनवले आहे. यासाठी मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना माझ्या खूप शुभेच्छा. हे दोघे राम आणि लक्ष्मण सारखेच आहेत. या मंदिराचे निर्माण होण्यासाठीच ते बनले आहेत, अशी प्रतिक्रिया सुमन तलवार यांनी केली आहे. त्यांच्या या वक्तव्याटी एकच चर्चा रंगत आहे.

सुमन तलवार हे मुख्यतः तेलुगु आणि तमिळमध्ये दिसून आले आहेत. त्यांनी काही कन्नड, मल्याळम आणि हिंदी चित्रपटांमध्येही काम केलं आहे. सुमारे 4 दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी 10 भाषांमधील 700 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 1980 आणि 1990 च्या दशकात तेलुगू सिनेमातील सर्वात प्रमुख अभिनेत्यांपैकी ते एक होते. त्यांच्या या वक्तव्याची आता चर्चा होत आहे.

‘अशी’ आहे रामलल्लाची मूर्ती-

तब्बल 500 वर्षांनी प्रभू राम (Ram Mandir Ayodhya) आपल्या जन्मभूमीत परतले आहेत. मोदींच्या हस्ते आज मंदिराचे उद्घाटन झाले. प्रभूच्या मुख दर्शनाने सर्वांचेच नयन आनंदाने भरून आले आहेत. शिल्पकार अरुण योगीराज यांनी ही मूर्ती घडवली आहे. 51 इंचची ही मूर्ती अत्यंत देखणी स्वरूपाची आहे. तीचे वजन 200 किलो आहे. भारतात सर्वसाधारणपणे पाच वर्षांच्या मुलाची उंची ही 51 इंच असल्याने रामलल्लाची मूर्तीदेखील तेवढ्याच उंचीही घडवण्यात आली आहे. या मूर्तीची निर्मिती शाळीग्राम या दगडात कोरीव काम करुन करण्यात आली.

News Title- Ram Mandir Ayodhya Suman Talwar big statement

महत्त्वाच्या बातम्या –

Ram Mandir | अयोध्या टेंट सिटीत फाईव्ह स्टार हॉटेलसारख्या सुविधा; व्हिडीओ तूफान व्हायरल

Ram Mandir | “नरेंद्र मोदींसारखा हिंदूंचं समर्थन करणारा पंतप्रधान अजूनपर्यंत झाला नाही”

Ram Mandir Inauguration Day | अवधपुरी झाली राममय; सोहळ्यासाठी भल्या पहाटे ‘हे’ स्टार्स अयोध्येत दाखल

Team India | जय श्री राम…! भारतीय खेळाडूचं शतक प्रभू श्री रामाला समर्पित

Mira Road Riots | सनातन यात्रेवर हल्ला! श्री रामाचे झेंडे फाडले; तणावानंतर मोठा पोलीस बंदोबस्त