3 लग्नं अन् एकाचवेळी 3 मोठ्या चुका! Shoaib Malik अडचणीत; चाहत्यांनी घेतली शाळा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Shoaib Malik । सध्या बांगलादेश प्रीमिअर लीगचा थरार रंगला आहे. या स्पर्धेत पाकिस्तानातील अनेक खेळाडू सहभागी झाले आहेत. वन डे आणि कसोटी क्रिकेटला रामराम केलेला शोएब मलिक ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये खेळताना दिसतो. त्याने अद्याप ट्वेंटी-20 आंतरराष्ट्रीयमधून निवृत्ती घेतली नाही. अलीकडेच शोएब मलिकने तिसरे लग्न केले अन् तो प्रसिद्धीच्या झोतात आला. मात्र, बांगलादेश प्रीमिअर लीगमधील एका सामन्यामुळे मलिक पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

पाकिस्तानच्या अष्टपैलू खेळाडूने एकाच षटकात तीन नो-बॉल टाकले. फॉर्च्युन बरीशालकडून खेळताना त्याने खुलना टायगर्सविरुद्ध ही लज्जास्पद कामगिरी केली. या षटकात त्याने एकूण 18 धावा दिल्या. मलिकच्या या षटकानंतर सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल होत आहेत. चाहते पाकिस्तानी खेळाडूची खिल्ली उडवत आहेत.

चाहत्यांनी घेतली शाळा

दरम्यान, शोएब मलिकने मागील आठवड्यातच तिसरे लग्न केले. आयशा सिद्दीकी आणि भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा यांच्याशी लग्न केल्यानंतर त्याने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी लग्न केले. लग्न झाल्यापासून तो ट्रेंडमध्ये आहे. आतापर्यंत सोशल मीडिया युजर्स त्याच्या तिसऱ्या लग्नाबद्दल मीम्स बनवत होते, आता शोएब मलिकने त्यांना आणखी एक संधी दिल्याचे दिसते.

 

बांगलादेश प्रीमिअर लीगमधील तीन नो-बॉलमुळे शोएबची तुलना त्याचा सहकारी मोहम्मद आमिरशी केली जात आहे. काही जण त्याला फिक्सर म्हणत आहेत. तर काहींनी म्हटले की, लग्न असो किंवा नो-बॉल, तो सर्वकाही तीनदा करतो. काही चाहत्यांनी भन्नाट प्रतिक्रिया देऊन शोएब मलिकची फिरकी घेतली.

Shoaib Malik वरून भन्नाट मीम्स व्हायरल

या सामन्यात फॉर्च्युन बरीशालने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 4 बाद 187 धावा केल्या. प्रत्युत्तरात खुलना टायगर्स संघ 188 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला तेव्हा फॉर्च्युन बरीशालकडून शोएब मलिकने डावातील चौथे षटक टाकले. शोएब मलिकने या षटकात 3 नो बॉल टाकले.

 

शोएबने पहिल्या 2 चेंडूंवर 5 धावा दिल्या. यानंतर तिसरा चेंडू निर्धाव गेला. चौथा चेंडू नो बॉल होता, जो त्याने पुन्हा टाकला आणि त्यावर एकही धाव दिली नाही. 5 वा चेंडू देखील निर्धाव होता. पण, षटकातील शेवटचा चेंडू टाकताना त्याने सलग दोन नो बॉल केले. इतकेच नाही तर त्यावर 6 धावाही गेल्या. शेवटचा चेंडू टाकला तेव्हा फलंदाजाने षटकार मारला. अशाप्रकारे शोएब मलिकने 3 वेळा नो बॉल टाकले अन् एका षटकात 18 धावा दिल्या.

News Title- Shoaib Malik is being trolled on social media after he bowled three no balls in a match in the Bangladesh Premier League
महत्त्वाच्या बातम्या –

Ram Mandir | किंग कोहलीचा ड्युप्लिकेट अयोध्येत! सेल्फी घेण्यासाठी उडाली झुंबड; Video ‘विराट’ Viral

Ram Mandir | विराट-रोहितची अनुपस्थिती! जड्डूची हजेरी; ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूचा भारताला ‘जय श्री राम’

Ayodhya Ram Mandir | अंबानी कुटुंबाकडून राम मंदिरासाठी कोट्यवधींचे दान; जाणून घ्या रक्कम

Ram Mandir Ayodhya | देशभरात दीपोत्सव अन् रोषणाई; दिल्लीत परतताच मोदींची सर्वसामान्यांसाठी मोठी घोषणा

Virat Kohli ची 2 सामन्यातून माघार! चाहत्यांनी लावला वेगळाच तर्क; म्हणाले, “अनुष्का दुसऱ्यांदा…”