Ayodhya Ram Mandir | अंबानी कुटुंबाकडून राम मंदिरासाठी कोट्यवधींचे दान; जाणून घ्या रक्कम

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ayodhya Ram Mandir | भाविकांच्या देणगीतून अयोध्येतील भव्य राम मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. सर्वसामान्य नागरिकांपासून विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळी राम मंदिरासाठी दान करत आहे. उद्योग क्षेत्रातील नामांकित अंबानी कुटुंबाने रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टला 2.51 कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. (Ram Janmabhoomi Teerth Kshetra Trust) सोमवारी अयोध्येत रामललाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी हजारो मान्यवरांमध्ये अंबानी कुटुंब होते.

अंबानी कुटुंबाकडून कोट्यवधींचे दान

अंबानी कुटुंबाने जारी केलेल्या निवेदनानुसार अयोध्येतील पवित्र राम मंदिराला देशासाठी सांस्कृतिक महत्त्व आहे. त्यामुळे आमचे कुटुंब मंदिरासाठी थोडेफार योगदान देऊ इच्छित आहे. रिलायन्स उद्योग समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी आणि त्यांच्या पत्नी नीता अंबानी अयोध्येतील अभिषेक सोहळ्यात सहभागी झाले होते. याशिवाय त्यांचा मुलगा आकाश पत्नी श्लोकासोबत, अनंत त्याची भावी पत्नी राधिका मर्चंटसोबत आणि मुलगी ईशा पती आनंद पिरामलसोबत उपस्थित होते.

दरम्यान, नीता अंबानी यांनी जय श्री रामचा नारा देत हा सोहळा म्हणजे अभूतपूर्व अनुभव असल्याचे सांगितले. मला इथे येऊन खूप आनंद झाला आहे. आम्हाला आमच्या भारतीय संस्कृतीचा आणि परंपरेचा अभिमान आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. अंबानी कुटुंबाशिवाय देशातील इतरही नामांकितांनी अयोध्येत हजेरी लावली होती.

 

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी देखील रामललाचे दर्शन घेतले. मुकेश अंबानी यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, बदलत असलेला भारत पाहण्याची संधी आम्हाला मिळाली आहे. इथे आल्याने मला एक विलक्षण अनुभव मिळाला. आम्ही आमच्या परीने थोडे योगदान देत आहोत.

Ayodhya Ram Mandir सर्वत्र जल्लोष

खरं तर या सोहळ्याला येणाऱ्या पाहुण्यांच्या यादीत अंबानी कुटुंबाव्यतिरिक्त 506 जणांची नावे होती. दिग्गज राजकारणी, उद्योगपती, बॉलिवूड कलाकार, खेळाडू, न्यायाधीश आणि धर्मगुरू यांचा विशेष सहभाग होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विधिवत पूजा करून अभिषेक सोहळा पूर्ण केला. या संपूर्ण कार्यक्रमाचे देशभरात थेट प्रक्षेपण करण्यात आले. राम मंदिरातील सर्व विधी मोदींनी पूर्ण केला. अभिजीत मुहूर्तावर रामललाच्या मूर्तीचा अभिषेक करण्यात आला. हा मुहूर्त केवळ 84 सेकंदांचा होता.

राजकीय मंडळी देखील अयोध्येत उपस्थित होती. मात्र, राम मंदिराच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमावरून राजकारण देखील चांगलेच तापले. बहुतांश विरोधी नेत्यांनी या अभिषेक सोहळ्याकडे पाठ फिरवली. काँग्रेससह ‘इंडिया’ आघाडीच्या अनेक पक्षांच्या नेत्यांना या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आले होते पण त्यांनी न येणे पसंत केले.

News Title- Ambani family donates Rs 2.51 crores for construction of Ram temple in Ayodhya
महत्त्वाच्या बातम्या –

Ram Mandir Ayodhya | देशभरात दीपोत्सव अन् रोषणाई; दिल्लीत परतताच मोदींची सर्वसामान्यांसाठी मोठी घोषणा

Virat Kohli ची 2 सामन्यातून माघार! चाहत्यांनी लावला वेगळाच तर्क; म्हणाले, “अनुष्का दुसऱ्यांदा…”

Bollywood च्या ‘या’ कलाकारांकडून राम मंदिरासाठी भरघोस दान; जाणून घ्या कुणी काय दिलं

Ram Mandir Ayodhya | “मोदी आणि योगी यांची जोडी म्हणजे जणू राम-लक्ष्मण”

Maharashtra politics | महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी समोर!