Ram Mandir | भव्य राम मंदिराचे उद्घाटन झाले असून आता सर्वसामान्यांच्या दर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. सोमवारी अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला ज्यामध्ये देशातील अनेक दिग्गजांनी सहभाग घेतला. टीम इंडियाचे स्टार फलंदाज विराट कोहली आणि कर्णधार रोहित शर्मा यांना निमंत्रण मिळाले होते, मात्र ते दोघेही या कार्यक्रमात सहभागी झाले नव्हते. या कार्यक्रमाला टीम इंडियातील फक्त रवींद्र जडेजा पोहोचला होता.
विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळी या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी अयोध्येत पोहचली होती. 22 जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम पार पडला, या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर मागील काही दिवसांपासून देशभरात जल्लोषाचे वातावरण आहे. या कार्यक्रमाला देशातील अनेक दिग्गजांना आमंत्रित करण्यात आले होते.
वॉर्नरचा भारताला ‘जय श्री राम’
अनेक भारतीय क्रिकेटपटूंना देखील आमंत्रित करण्यात आले होते, ज्यात विराट कोहली, रोहित शर्मा, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा यांच्या नावाचा समावेश होता. मात्र, कोहली, रोहित आणि अश्विन या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. खरं तर राम मंदिराची ख्याती केवळ भारतापुरती मर्यादित नसून याचा जल्लोष परदेशातही साजरा करण्यात आला. ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरनेही राम मंदिराबाबत आनंद व्यक्त केला आहे.
View this post on Instagram
तसेच वॉर्नरने तमाम भारतीयांसाठी ‘जय श्री राम’ असा मेसेज लिहला. या कार्यक्रमाला भारतीय संघाचा माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे आणि माजी गोलंदाजी प्रशिक्षक व्यंकटेश प्रसाद उपस्थित होता. याशिवाय टीम इंडियाचा सदस्य रवींद्र जडेजा देखील पत्नी रिवाबासोबत या कार्यक्रमात सहभागी झाला होता. नुकतीच कसोटी आणि वन डे क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला ऑस्ट्रेलियाचा डावखुरा फलंदाज डेव्हिड वॉर्नरने राम मंदिरासंदर्भात एक पोस्ट टाकली आहे.
Ram Mandir परदेशातही जल्लोष
त्याने प्रभू श्री रामाचा एक फोटो शेअर करत म्हटले, “जय श्री राम इंडिया.” वॉर्नर सतत भारतीय चित्रपटांबद्दल पोस्ट करत असतो आणि सोशल मीडियावर व्यक्त होत असतो. वॉर्नरपूर्वी दक्षिण आफ्रिकेचा फिरकी गोलंदाज केशव महाराजने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता, ज्यामध्ये त्याने मंदिरावरून दक्षिण आफ्रिकेतील भारतीय समुदायाचे अभिनंदन केले.
जय श्रीराम 🙏🙏🙏#ayodhyarammandir@imjadeja pic.twitter.com/Cqv3giPxfF
— Rivaba Ravindrasinh Jadeja (@Rivaba4BJP) January 22, 2024
विराट-रोहितची अनुपस्थिती
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनाही प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले होते. मात्र हे दोघेही या कार्यक्रमाला आले नाहीत. भारतीय संघ सध्या हैदराबादमध्ये आहे जिथे त्यांना पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळायचा आहे. विराटने वैयक्तिक कारणास्तव पहिल्या दोन सामन्यांमधून माघार घेतली आहे. कदाचित त्यामुळेच तो अयोध्येला पोहोचला नाही. कसोटी मालिकेसाठी निवडलेल्या संघापैकी फक्त रवींद्र जडेजा अयोध्येला पोहोचला होता.
News Title- Virat Kohli and Rohit Sharma were absent from the Ram Temple inauguration, David Warner sent a message of Jai Shri Ram for Indians