Kangana Ranaut | ‘बागेश्वर बाबांना मिठी मारण्याची इच्छा होती पण…’; कंगणाचं मोठं वक्तव्य

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Kangana Ranaut | अयोध्येत भव्य दिव्य प्रभू श्रीराम मंदिराचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालं. यावेळी देशभरातील दिग्गज कलाकार, खेळाडू , उद्योगपती यांची उपस्थिती होती.यात ड्रामा क्वीन कंगना रनौतचाही समावेश होता. कंगनाने (Kangana Ranaut) काल अयोध्येमध्ये बागेश्वर बाबांची देखील भेट घेतली.

कंगनाने बागेश्वर बाबांसोबतचे फोटो सोशल मिडियावर पोस्ट करत केले. यानंतर ते फोटो वाऱ्यासारखे व्हायरल झाले. तिने या फोटोला दिलेले कॅप्शन आता चर्चेत आलं आहे. तिने बागेश्वर बाबाला बघून काय वाटलं, या भावना सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत.

कंगना रनौतची पोस्ट व्हायरल

कंगनाने बागेश्वर बाबा (Bageshwar Baba) यांच्या भेटीचा फोटो इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये पोस्ट केला. त्यात तिने लिहिले की,” पहिल्यांदा माझ्यापेक्षा कमी वयाच्या गुरुजींना मी भेटले. माझ्यापेक्षा ते जवळपास दहा वर्षांनी लहान आहेत. मनात त्यांना छोट्या भावासारखं मिठी मारण्याची इच्छा होती, पण नंतर लक्षात आलं की कोणी वयाने गुरू बनत नाही तर कर्माने गुरूचा मान मिळतो. गुरुजींचे चरणस्पर्श करत मी त्यांचा आशीर्वाद घेतला. जय बजरंगबली.”, तिची ही पोस्ट आता चांगली व्हायरल होत आहे.

कंगनाने (Kangana Ranaut) अयोध्येत ‘जय श्री राम’चे नारे देखील दिले. प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी ती खूपच उत्साहित होती. मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर कंगनाने तिथल्या साधूसंतांचीही भेट घेतली. बागेश्वर धाम सरकार म्हणजेच धीरेंद्र कृष्णा शास्त्री यांच्या भेटीनंतर तिने लगेच फोटो सोशल मिडियावर पोस्ट केले.

अयोध्येत सुमारे आठ हजार निमंत्रित उपस्थित

अयोध्येत झालेल्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यात देशातील राजकारणी, चित्रपट दिग्गज, अनेक ज्येष्ठ साहित्यिक, उद्याोजक, खेळाडू यांच्यासह विविध पंथांचे शेकडो साधुसंत असे सुमारे आठ हजार निमंत्रित उपस्थित होते. अभिनेत्री हेमा मालिनी, कंगना रनौत, (Kangana Ranaut) रजनीकांत, मधुर भांडारकर, सुभाष घई, सोनू निगम, आचार्य श्री श्री रविशंकर, मोरारी बापू हे सर्व मान्यवर रविवारीच अयोध्येमध्ये दाखल झाले होते.

तर, सोहळ्याच्या दिवशी अभिनेता विकी कौशल पत्नी कॅटरिना कैफ, रणबीर कपूर आलिया भट्ट, माधुरी दीक्षित, आयुष्मान खुराना आदि कलाकार सोहळ्याच्या दिवशी पहाटे अयोध्येत दाखल झाले होते. यावेळी क्रिकेट जगतातीलही अनेक दिग्गजांची उपस्थिती देखील पाहायला मिळाली.

News Title- Kangana Ranaut Statement About BageshwarBaba


महत्त्वाच्या बातम्या –

3 लग्नं अन् एकाचवेळी 3 मोठ्या चुका! Shoaib Malik अडचणीत; चाहत्यांनी घेतली शाळा

Ram Mandir | किंग कोहलीचा ड्युप्लिकेट अयोध्येत! सेल्फी घेण्यासाठी उडाली झुंबड; Video ‘विराट’ Viral

Ram Mandir | विराट-रोहितची अनुपस्थिती! जड्डूची हजेरी; ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूचा भारताला ‘जय श्री राम’

Ayodhya Ram Mandir | अंबानी कुटुंबाकडून राम मंदिरासाठी कोट्यवधींचे दान; जाणून घ्या रक्कम

Ram Mandir Ayodhya | देशभरात दीपोत्सव अन् रोषणाई; दिल्लीत परतताच मोदींची सर्वसामान्यांसाठी मोठी घोषणा