Bigg Boss 17 | ‘हा’ तगडा स्पर्धक बिग बॉसधून बाहेर; टॉप 5 नावे बघून चाहत्यांना मोठा धक्का

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Bigg Boss 17 | बिग बॉस 17 (Bigg Boss 17)चा विजेता कोण ठरणार याच्या चर्चा असतानाच एक मोठी माहिती समोर आली आहे. आयशा आणि ईशा यांच्यानंतर बिग बॉसच्या घरातून अजून एका जनाचा पत्ता कट झाला आहे. यात अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande)चं नाव असल्याचं म्हटलं जात होतं. कलर्स टीव्हीने सोशल मिडियावर एक पोस्ट केल्यानंतर या चर्चा अधिकच रंगल्या.

आता मिळालेल्या माहितीनुसार अंकिता नाही तर तिचा पती विकी जैन शोमधून बाहेर झाल्याचं कळतं आहे. 28 जानेवारीला शोचा अंतिम भाग होणार आहे. फिनालेपुर्वी झालेल्या शेवटच्या एविक्शनमधून अनेकांना धक्का बसला. कारण विकी जैन (Vicky Jain) विजेत्याचा पक्का दावेदार मानला जात होता. मात्र, त्याचं नाव आल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

विकी जैनचा बिग बॉसमधून पत्ता कट

मागच्याच आठवड्यात (Bigg Boss 17) आयशा आणि ईशा या बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्या आहेत. त्यांच्यानंतर विकी जैनचाही प्रवास आता इथेच थांबला असल्याचं म्हटलं जात आहे. फिनालेपुर्वी झालेल्या मिडनाइट एविक्शनमध्ये विकी जैनला घरातून काढण्यात आलं आहे. यात विकी जैन आणि अरुण माशेट्टी यांच्यात मुकाबला झाला होता. आता टॉप 5 स्पर्धकमध्ये लढाई होणार आहे.

या टॉप 5 मध्ये मुनव्वर फारूकी, अंकिता लोखंडे, अभिषेक कुमार, मन्नारा चोप्रा आणि अरुण माशेट्टी यांची नावे आहेत. आता यांच्यापैकी कोण जिंकणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. विकी जैन बाहेर पडताच सोशल मिडियावर प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली. काही युजरने तर, विकी बाहेर पडला हे बरंच झालं, असं म्हटलं आहे.

अंकिता-विकी जैन कायम चर्चेत राहिले

अंकिता लोखंडे आणि विकी जैन दोघेही सोबत बिग बॉसमध्ये (Bigg Boss 17) सामील झाले होते. अगदी पहिल्या दिवसापासून त्यांच्यातील प्रेम नाही तर वादच समोर आले. कधी वागण्यावरून तर कधी दिवंगत सुशांत सिंहच्या मुद्यावरून त्यांच्यात भांडण झाली. विकी जैनची आई देखील बरीच ट्रोल झाली. सोशल मिडियावर त्यांना वाईट सासुचा टॅग मिळून गेला.

त्यामुळे बिग बॉस मध्ये अंकिता आणि विकी यांचं नातंच अधिक चर्चेत होतं. आता विकी जैन बाहेर पडला आहे. त्यामुळे अंकिता विजेती ठरणार का , याबाबत बोललं जात आहे. फिनाले पुर्वी बिग बॉसमध्ये मिडियाला बोलावण्यात आलं होतं. यावेळी मिडियाने विकीला अनेक प्रश्न विचारात त्याचा घमंड तोडला. विकी जैनने बिग बॉसच्या घरात अखेरच्या क्षणात आपली चूक मान्य करत पत्नी अंकिताची माफी मागितली. त्यामुळे आता बिग बॉसचा विजेता कोण ठरणार याची सर्वांना प्रतिक्षा असणार आहे.

News Title-  Vicky Jain out of Bigg Boss 17

महत्त्वाच्या बातम्या –

3 लग्नं अन् एकाचवेळी 3 मोठ्या चुका! Shoaib Malik अडचणीत; चाहत्यांनी घेतली शाळा

Ram Mandir | किंग कोहलीचा ड्युप्लिकेट अयोध्येत! सेल्फी घेण्यासाठी उडाली झुंबड; Video ‘विराट’ Viral

Ram Mandir | विराट-रोहितची अनुपस्थिती! जड्डूची हजेरी; ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूचा भारताला ‘जय श्री राम’

Ayodhya Ram Mandir | अंबानी कुटुंबाकडून राम मंदिरासाठी कोट्यवधींचे दान; जाणून घ्या रक्कम

Ram Mandir Ayodhya | देशभरात दीपोत्सव अन् रोषणाई; दिल्लीत परतताच मोदींची सर्वसामान्यांसाठी मोठी घोषणा