Bigg Boss 17 | बिग बॉस 17 (Bigg Boss 17) चा फिनाले आता जवळ आला आहे. सर्वांचंच लक्ष आता विजेता कोण ठरणार?, याकडे लागलं आहे. त्यापुर्वीच शोचा लेटेस्ट एपिसोडचा टीजर समोर आला आहे. त्यात बिग बॉसच्या घरात प्रेस कॉन्फरन्स ठेवण्यात आली होती. यावेळी मिडियाने स्पर्धकांना रोखठोक सवाल केले.
त्यात अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि तिचा पती विकी जैन (Vicky Jain) यांना मीडियाने अनेक सवाल केले. बिग बॉसमध्ये सामील होताच या जोडप्यात अनेक भाडणं झाली. त्यांच्यातील कौटुंबिक वादही समोर आले. बऱ्याचदा विकी जैनने अंकितावर अनेक आरोप केले. या सर्व मुद्यांवर मिडियाने विकीला रोखठोक सवाल करत त्याचा अहंकारच उतरवला.
विकी जैनने मागितली अंकिताशी माफी
तुम्ही दोघेही बिग बॉसमध्ये (Bigg Boss 17) सामील झालात. मात्र, तुमच्यात प्रेमाऐवजी वादच अधिक दिसून आले. बऱ्याचदा तुझी आई अंकिताशी बायस पद्धतीने वागली मग तु तुझ्या पत्नीसाठी स्टँड कधी करशील?, असा सवाल एका रिपोर्टरने विकी जैनशी केला. यावर “जेव्हा दोन वोकल लोकमध्ये वाद होतात तेव्हा ते वाद अजूनच वाढतात. कारण, ते कोणतेही फिल्टर लावल्याशिवाय बोलत असतात.”, असे विकी म्हणाला.
तर, पुढे एकाने विचारले की (Bigg Boss 17) ‘शो संपल्यानंतर तुम्ही कपल थेरपी घेणार का?’, यावर विकीने दिलेले उत्तर चर्चेत आले आहे.”थेरपी हीच आहे. मी आताच तिला गुडघ्यावर बसून सॉरी म्हणेल.”, असे तो म्हणाला. यानंतर लगेच त्याने ‘सॉरी मंकू, माझ्या खूप चुका आहेत. मला माफ कर’, असे म्हटले.
View this post on Instagram
पुढे विकी जैनला आपल्या चुकीची जाणीव झाली. “मला एक गोष्ट सांगायची आहे की, आम्ही दोघेही घरी एकटेच राहतो. त्यामुळे त्यावेळी तुमच्या चुका तुम्हाला सांगायला कोणीही नसतं आणि तुम्हाला कळतही नाही. आज या 100 दिवसांत पहिल्यांदाच, जेव्हा प्रत्येकजण मला एकच प्रश्न विचारत आहे, तेव्हा मी माझ्या भूतकाळातील सर्व चुकांचा विचार करत आहे, ज्या मला कधीच कळल्या नाहीत. आमच्यात काहीतरी चूक झाली आहे जी व्हायला नको होती.”, असे विकी जैन म्हणाला.
मिडियाने तोडला विकी जैनचा अहंकार
‘मी तुझ्यासारख्या 200 लोकांना माझ्या घरी कामावर ठेवले आहे.’, असे विकी जैन मूनव्वरला म्हणाला होता. यावर एका मिडिया प्रतिनिधिने त्याला थेट विचारले की, “तुला कोळशाच्या खाणी असल्याचा अधिक घमंड आहे की अंकिताचा पती असल्याचा अधिक”, यावर विकीने खूप शांतपणे उत्तर दिले.’मला अंकिताचा नवरा असण्याचाही अहंकार आहे आणि कोळशाच्या खाणी असल्याचा देखील आहे.’, त्याचे हे विधानही चर्चेत आलं आहे.
त्यामुळे बिग बॉसच्या (Bigg Boss 17) अखेरच्या काही दिवसांत विकी जैनला आपल्या चुकीची अनुभूति झाल्याचं म्हटलं जात आहे. हा एपिसोड लवकरच रिलीज होणार आहे. चाहते या दोघांत लवकर सर्व भांडण मिटावे याचीच अपेक्षा ठेवत आहेत.
News Title- Bigg Boss 17 Vicky Jain apologized to Ankita
महत्त्वाच्या बातम्या –
Ram Mandir | किंग कोहलीचा ड्युप्लिकेट अयोध्येत! सेल्फी घेण्यासाठी उडाली झुंबड; Video ‘विराट’ Viral
Ram Mandir | विराट-रोहितची अनुपस्थिती! जड्डूची हजेरी; ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूचा भारताला ‘जय श्री राम’
Ayodhya Ram Mandir | अंबानी कुटुंबाकडून राम मंदिरासाठी कोट्यवधींचे दान; जाणून घ्या रक्कम
Virat Kohli ची 2 सामन्यातून माघार! चाहत्यांनी लावला वेगळाच तर्क; म्हणाले, “अनुष्का दुसऱ्यांदा…”