Apple Side Effects | हिवाळ्यात सफरचंद हे फळ अधिक खाल्लं जातं. डॉक्टरांपासून दुर राहायचं असेल तर रोज एक सफरचंद खा, असं नेहमी म्हटलं जातं. पण, रोज सफरचंद खाणं तुम्हाला तेवढंच महागातही पडू शकतं. हो तुम्ही ऐकताय ते अगदी खरं आहे. कशाचंही अतिसेवन हे घातकच असतं.
‘अति तेथे माती’ ही म्हण फक्त सामाजिक किंवा वैयक्तिक जीवनात लागू नाही होत तर, खाण्याच्या बाबतीतही ती लागू पडतंच. म्हणून खाण्यावर नियंत्रण असायलाच हवं. कोणत्याही गोष्टीचे अतिसेवन शरीरासाठी घातक असतं. आज आपण सफरचंद (Apple Side Effects) रोज खाण्याने काय होऊ शकतं, याबाबत जाणून घेऊयात.
सफरचंदचं अधिक सेवन पडेल महागात
सफरचंद (Apple Side Effects) या फळात अनेक पोषक घटक असतात. त्याच्यात पोटॅशियम, फायबर, आयरन आणि मॅग्नेशियम हे घटक भरपूर प्रमाणात असतात. मात्र सफरचंदचे अतिसेवन केलं तर, शरीराला नुकसान होऊ शकतं. अधिक सफरचंद खाल्ल्याने पचन क्षमता बिघडू शकते. त्यात भरपूर फायबर असल्याने जास्त खाल्ल्यास तुम्हाला गॅसची समस्या होऊ शकते. यामुळे पोटदुखी आणि कळा येऊ शकतात.
जाणकारांच्या मते, शरीराला दिवसाला 20 ते 40 ग्रॅम फायबरची आवश्यकता असते. परंतु एका दिवसात 70 ग्रॅम पेक्षा जास्त फायबर घेतल्यास पोटाच्या समस्या उद्भवू शकतात. यासोबतच ब्लड शुगर देखील वाढू शकते. काही अभ्यासकांच्या मते सफरचंदमध्ये कीटकनाशकेही आढळून आली आहेत. त्यात डिफेनिलामाइन नावाचं रासायनिक संयुग असतं. ज्यावर युरोपियन युनियनने बंदी घातली आहे. या रसायनाचा धोका शरीरासाठी अधिक असतो. त्यामुळे सफरचंदचे अधिक सेवन करू नये.
दातांच्या आरोग्यासाठी घातक
तुम्हाला पांढरे शुभ्र आणि निरोगी दात हवे असतील, तर सफरचंदचे (Apple Side Effects) अधिक सेवन करणं आताच थांबवा. कारण, सफरचंद सोड्यापेक्षा जास्त अम्लीय असते. त्यामुळे ते मागच्या दातांनी खावं असं डॉक्टर म्हणत असतात. अशात सफरचंद जास्त प्रमाणात खाल्ल्याने तुमच्या दातांना इजा होऊ शकते.
तुम्ही दिवसाला एक किंवा जास्तीत जास्त दोन सफरचंद खायला पाहिजे. यापेक्षा अधिकचं सेवन घातक ठरू शकतं. अधिकचं सफरचंद खाल्ल्याने वजन वाढू शकतं आणि अधिकचं वजन म्हणजे अनेक आजारांना निमंत्रण असतं. त्यामुळे दिवसाला एक सफरचंद शरीरासाठी पुरे ठरतं.
News Title- Apple Side Effects
महत्त्वाच्या बातम्या –
Bigg Boss 17 | ‘हा’ तगडा स्पर्धक बिग बॉसधून बाहेर; टॉप 5 नावे बघून चाहत्यांना मोठा धक्का
Kangana Ranaut | ‘बागेश्वर बाबांना मिठी मारण्याची इच्छा होती पण…’; कंगणाचं मोठं वक्तव्य
Saif Ali Khan च्या प्रकृतीबद्दल सर्वांत मोठी अपडेट समोर!
Bigg Boss 17 | ‘तुला अंकितापेक्षा कोळशाच्या खाणीचा अहंकार…’; मिडियाने विकी जैनला सुनावलं
Narendra Modi | अयोध्येतून दिल्लीत परतताच नरेंद्र मोदींची मोठी घोषणा!