Post Office Scheme For Womens | पोस्ट ऑफिसने महिलांसाठी आणली ‘ही’ खास योजना; 2 वर्षात जमतील 2 लाख

Post Office Scheme For Womens | भारतीय पोस्ट ऑफिस नेहमीच आकर्षक व्याजदरासह नवीन-नवीन स्कीम आणत असते. आता अशीच एक नवीन स्कीम पोस्ट ऑफिसने खास महिलांसाठी (Post Office Scheme For Womens) आणली आहे. पोस्ट ऑफिसची महिला सन्मान बचत पत्र योजना (Mahila Samman Bachat Yojana) ही खास महिलांसाठी सुरू करण्यात आली आहे.

पोस्ट ऑफिसची ही योजना एप्रिल 2023 ते मार्च 2025 या कालावधीसाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेत नेमका काय लाभ मिळणार, यावर कर कपातीचा लाभ उपलब्ध आहे की नाही याबाबत तुम्हाला अधिक महिती इथे सांगणार आहोत.

योजनेत कोणते लाभ मिळणार?

पोस्ट ऑफिसने ही योजना खास महिलांसाठी (Post Office Scheme For Womens) सुरू केली आहे. यात देशातील महिला स्वतःसाठी आणि त्यांच्या अल्पवयीन मुलींसाठी पैशांची गुंतवणूक करू शकतात. यासोबतच पती पत्नीसाठी देखील या योजनेत गुंतवणूक करता येऊ शकते. करदात्यांना काही सरकारी योजनांवर कर सवलतींचा लाभ मिळत असतो. मात्र, महिला सन्मान बचत पत्र ही योजना करमुक्त नाही.

म्हणजेच या योजनेत गुंतवणूक दारांना मिळणाऱ्या व्याजावर कर भरावा लागतो. अर्थातच योजनेवर मिळणाऱ्या व्याजावर कोणताही कर लाभ उपलब्ध नाही. तर, याच्या व्याजावर टीडीएस कट केला जातो. एक प्रकारे ही योजना एफडी सारखीच आहे. म्हणजेच तुम्ही जर या योजनेमध्ये 2 वर्षांसाठी गुंतवणूक केली तर, तुम्हाला मुदतपूर्तीनंतर 2.32 लाख रुपये प्राप्त होतील.

‘अशी’ करा गुंतवणूक

महिला सन्मान बचत पत्र योजनामध्ये (Post Office Scheme For Womens) गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला किमान 1000 रुपये भरावे लागतील. तर, कमाल 2 लाख रुपयांपर्यंतच गुंतवणूक करता येईल. तुमचे जर अगोदरच महिला बचत खाते असेल आणि तुम्हाला दुसरे खाते उघडायचे असेल तर या दोन्ही खात्यामध्ये किमान 3 महिन्यांचे अंतर असणे बंधनकारक आहे.

या योजनेवर सरकार तुम्हाला 7.5 टक्क्याने व्याज देते. हे व्याज तिमाही आधारावर जमा केले जाते. प्रथम वर्षानंतर खातेदार 40 टक्के रक्कम काढू शकतो. म्हणजेच तुम्ही जर ऑक्टोबर 2023 मध्ये खाते उघडले असेल तर ते ऑक्टोबर 2025 मध्ये मॅच्युअर होईल. या योजनेचा फायदा घेण्यासाठी तुम्ही देशातील कोणत्याही बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये खाते ओपन करू शकता. यासाठी तुम्हाला KYC कागदपत्रे लागतील.

News Title-  Post Office Scheme For Womens

महत्त्वाच्या बातम्या – 

Share Market | गुंतवणूकदारांना फायदाच फायदा; मोदींच्या घोषणेनंतर ‘हा’ शेअर सुसाट

Bigg Boss 17 | ‘हा’ तगडा स्पर्धक बिग बॉसधून बाहेर; टॉप 5 नावे बघून चाहत्यांना मोठा धक्का

Kangana Ranaut | ‘बागेश्वर बाबांना मिठी मारण्याची इच्छा होती पण…’; कंगणाचं मोठं वक्तव्य

Saif Ali Khan च्या प्रकृतीबद्दल सर्वांत मोठी अपडेट समोर!

Bigg Boss 17 | ‘तुला अंकितापेक्षा कोळशाच्या खाणीचा अहंकार…’; मिडियाने विकी जैनला सुनावलं