Manoj Jarange | मनोज जरांगेंचा झंजावात पुण्यात; ‘हे’ रस्ते राहतील बंद

Manoj Jarange | 20 जानेवारीला मराठा समाज लाखोच्या संख्येने अंतरवली सराटी येथून निघाला आहे. आज मराठा आंदोलकांनी पुण्यात प्रवेश केला आहे. या मजलदर मजल करत निघालेला मराठा समाज येत्या काही दिवसात मुंबई गाठणार आहे. 24 जानेवारीला हा मोर्चा पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये पोहोचणार आहे. मोठ्या प्रमाणात आंदोलक येणार असल्याने पुण्याच्या वाहतुकीत आज मोठे बदल करण्यात आले आहेत.

मराठा मोर्चामुळे पुण्याच्या वाहतुकीत मोठे बदल

24 जानेवारी रोजी सकाळी 6 वाजल्यापासून मोर्चा पुणे ग्रामीण भागात येईपर्यंत सर्व वाहनांची वाहतूक तात्पुरती बंद राहणार आहे. पर्यायी मार्गावरील वाहनचालकांना मार्गदर्शन करून वाहतूक वळवण्यात येणार आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) आणि हजारो समर्थक नगर रस्त्यावरील रांजणगाव, कोरेगाव भीमामार्गे खराडी-वाघोली परिसरात मुक्कामी येणार असल्याने नगर रस्त्यावरील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत.

नगर रस्त्यावरील वाहतूक मंगळवारी पहाटे तीननंतर हळू हळू वळवण्यात येणार आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून नगरकडे जाणारी वाहने कात्रज, खडी मशिन चौक, मंतरवाडी फाटा, हडपसरमार्गे सोलापूर रस्ता, केडगाव चौफुलामार्गे, न्हावरे, शिरुरमार्गे नगर रस्त्याकडे वळवण्यात आली आहे. तर वाघोली, लोणीकंदमार्गे नगरकडे जाणारी वाहतूक ही थेऊर फाटामार्गे सोलापूर रस्त्याकडे वळवण्यात आली आहे. जरांगे यांच्यासह हजारो समर्थक वाघोलीतील चोखीदाणी, खराडी परिसरात मुक्कामी असणार आहेत. या ठिकाणी आंदोलकांची गैरसोय होऊ नये या साठी पाण्याचे टँकर, आरोग्य सुविधा, देण्यात आली आहे.

यात्रेदरम्यान अनुचित प्रकार टाळण्यासाठी एक हजार पोलीस कर्मचारी, राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन तुकड्या, दंगल नियंत्रक पथक, गृहरक्षक दलाचे 800 जवान तैनात करण्यात आले आहे.

Manoj Jarange | ‘हे’ रस्ते राहतील बंद

औंध डीमार्ट ते सांगवी फाटा – सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी. या मार्गावरील वाहनांनी पोल चौकातून डावीकडे वळून नागराज रोडमार्गे आपल्या गंतव्यस्थानी जावे.

पिंपळे निलख ते रक्षक चौक- पिंपळे निलख येथून येणाऱ्या वाहनांनी रक्षक चौकात न जाता विशाल नगर डीपी रोडमार्गे जगताप चौक – कस्पटे चौक मार्गाने जावे.

जगताप डेअरी पुलाखालील चौक- कसपटे चौकातील वाहने जगताप डेअरी चौकाखालील ग्रेड सेपरेटरद्वारे शिवार चौक, कोकणे चौक येथून थेट आपल्या गंतव्यस्थानी पोहोचावीत. औंध रावेत रोडने डाव्या व उजव्या बाजूने जाणं टाळावं.

शिवार चौक वाहतूक- शिवार चौकातून होणारी वाहतूक औंध रावेत बीआरटीएस रोडकडे उजवीकडे आणि डावीकडे वळू नये. त्याऐवजी कस्पटे चौकातून थेट ग्रेड सेपरेटरमधून इच्छित स्थळी जावं.

महत्त्वाच्या बातम्या- 

Shreyas Talpade | ‘… हा तर मराठी इंडस्ट्रीचा विजय थालापती’, प्रसिद्ध अभिनेत्याचा व्हिडीओ व्हायरल

Manoj Jarange | ‘मारण्याचा प्रयोग केला तर…’; जरांगेंचा सरकारला अत्यंत गंभीर इशारा

Share Market | गुंतवणूकदारांना फायदाच फायदा; मोदींच्या घोषणेनंतर ‘हा’ शेअर सुसाट

Bigg Boss 17 | ‘हा’ तगडा स्पर्धक बिग बॉसधून बाहेर; टॉप 5 नावे बघून चाहत्यांना मोठा धक्का

Kangana Ranaut | ‘बागेश्वर बाबांना मिठी मारण्याची इच्छा होती पण…’; कंगणाचं मोठं वक्तव्य