Amitabh bachchan | अमिताभ बच्चन यांना आली रेखाची आठवण?, फोटो पोस्ट करत म्हणाले

Amitabh Bachchan | दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन कायम चर्चेत असतात. त्यांच्या उत्कृष्ट अभिनयामुळे लाखो लोक त्यांचे चाहते आहेत. 70 ते 90 चं दशक गाजवणारे अमिताभ बच्चन आज देखील वेगवगेळ्या भूमिकांमधून आपली छाप टाकत आहेत. अमिताभ बच्चन यांची सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून ते नवनवीन पोस्ट शेअर करत असतात. मात्र, सध्या चर्चा होत आहे ती त्यांनी शेअर केलेल्या एका जुन्या फोटोची.

अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेला फोटो चर्चेत

अमिताभ बच्चन (Amitabh bachchan) आपल्या चाहत्यांसाठी वेगवेगळे पोस्ट शेअर करत असतात. कधी कधी ते ब्लॉगद्वारे अनेक गोष्टी, किस्से, आठवणी चाहत्यांसोबत शेअर करत असतात. दरम्यान नुकताच त्यांनी एक फोटो शेअर केला. ज्यामुळे चर्चांना उधाण आलं. सोशल मीडियावर फोटो शेअर केलेल्या फोटोमध्ये अभिनेत्री रेखा, राज कपूर, विनोद खन्ना, संगीत दिग्दर्शक कल्याण, रणधीर कपूर, मेहमूद आणि शम्मी कपूर पहायला मिळत आहेत.

70 च्या दशकातील एका कार्यक्रमातील हा फोटो आहे. या फोटोमागे मोठी कहाणी असल्याचं त्यांनी म्हटलंय. बिग बी आणि रेखा यांचं नातं जगजाहीर होतं. त्यामुळे त्यांनी रेखा यांच्यासोबत फोटो पोस्ट करताच नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या.

काय म्हणाले अमिताभ बच्चन?

सोशल मीडियावर फोटो शेअर करत अमिताभ बच्चन (Amitabh bachchan) म्हणाले की, “या फोटोमागे खूप मोठी कहाणी आहे. एकेदिवशी ती सांगितली पाहिजे”. दरम्यान, या फोटोमध्ये अमिताभ बच्चन यांच्याबोबर बाॅलिवूडचे काही कलाकार स्टेजवर उभे आहेत. अमिताभ बच्चन यांच्यासोबत मंचावर विनोद खन्ना, संगीत दिग्दर्शक कल्याण, राज कपूर, रणधीर कपूर, मेहमूद, रेखा आणि शम्मी कपूर असल्याचं चित्र पाहयला मिळत आहे.

Amitabh Bachchan shares old picture with Raj Kapoor, Shammi Kapoor, Rekha, Mehmood and others.

आयोध्येला जाताना केला फोटो शेअर

आयोध्येतील श्री राम मंदिर उद्घाटन सोहळ्याला अनेक कलाकारांना अमंत्रित केलं होतं. दरम्यान यावेळी बच्चन कुटुंबाला देखील या कार्यक्रमाला आमंत्रण दिलं होतं. मुलगा अभिषेक बच्चनसोबत मुंबईहून अयोध्येला निघण्याच्या काही तास आधी त्यांनी हा फोटो शेअर केला होता.

News Title : amitabh bachchan shares actress rekhas post

महत्त्वातच्या बातम्या-

Manoj Jarange | ‘मारण्याचा प्रयोग केला तर…’; जरांगेंचा सरकारला अत्यंत गंभीर इशारा

Share Market | गुंतवणूकदारांना फायदाच फायदा; मोदींच्या घोषणेनंतर ‘हा’ शेअर सुसाट

Bigg Boss 17 | ‘हा’ तगडा स्पर्धक बिग बॉसधून बाहेर; टॉप 5 नावे बघून चाहत्यांना मोठा धक्का

Kangana Ranaut | ‘बागेश्वर बाबांना मिठी मारण्याची इच्छा होती पण…’; कंगणाचं मोठं वक्तव्य

Saif Ali Khan च्या प्रकृतीबद्दल सर्वांत मोठी अपडेट समोर!