Manoj Jarange | ‘मारण्याचा प्रयोग केला तर…’; जरांगेंचा सरकारला अत्यंत गंभीर इशारा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | मराठ्यांचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) अंतरवली सराटी ते मुंबई असा पायी मोर्चा काढला आहे. यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा पेटला आहे. जरांगेंनी सरकारला पुन्हा एकदा अत्यंत गंभीर इशार दिला आहे.

जरांगेंचा सरकारला अत्यंत गंभीर इशारा

आमच्या आंदोलनाला कुठलेही गालबोट लावण्याचा प्रयत्न करू नका, मारण्याचा प्रयोग केला तर महाराष्ट्रातला एकही रस्ता वर्षांवर्ष खुला राहणार नाही, आणि हेही चॅलेंज बघायचं असेल तर बघा, असा थेट इशारा जरांगे (Manoj Jarange) यांनी सरकराला दिला आहे.

सत्तेचा राग डोक्यात ठेवून काम करत असाल, तर सत्ता येत असते आणि जात असते. पण मराठे कायमचे आयुष्यातून राजकीय सुपडासाप करतील, असा सरकारमधील नेत्यांना जरांगे यांनी इशारा दिला आहे.

Manoj Jarange | “मारण्याचा प्रयोग केला तर…”

सरकारने शहाणपण घेतलं तर बरं राहील. समाजाला वेड्यात काढन सोडावं. आरक्षण मिळालं तरी माझ्या जातीपुढे अनेक प्रश्न आहेत. तसेच, मारण्याचा प्रयोग केला तर महाराष्ट्रातला एकही रस्ता वर्षांवर्ष खुला राहणार नाही, हेही चॅलेंज बघायचं असेल तर बघावं, असं जरांगेंनी म्हटलंय.

मुंबईकरांनी तांब्या भरून पाणी द्यावं अशी अपेक्षा आम्हाला आहे. समाजासाठी थोडा त्रास सहन करावा, सर्व जाती धर्मातील मुंबईच्या लोकांना हात जोडून अवाहन आहे. शांततेत आमरण उपोषण करणारच, समाजासाठी मी माझ्या जीवाची पर्वा करत नाही. मी मरायला सुद्धा भीत नाही, असंही जरांगे म्हणाले.

दरम्यान, 20 जानेवारीला मराठा समाज लाखोच्या संख्येने अंतरवली सराटी येथून निघाला आहे. आज मराठा आंदोलकांनी पुण्यात प्रवेश केला आहे. या मजलदर मजल करीत निघालेला मराठा समाज येत्या काही दिवसात मुंबई गाठणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

Share Market | गुंतवणूकदारांना फायदाच फायदा; मोदींच्या घोषणेनंतर ‘हा’ शेअर सुसाट

Bigg Boss 17 | ‘हा’ तगडा स्पर्धक बिग बॉसधून बाहेर; टॉप 5 नावे बघून चाहत्यांना मोठा धक्का

Kangana Ranaut | ‘बागेश्वर बाबांना मिठी मारण्याची इच्छा होती पण…’; कंगणाचं मोठं वक्तव्य

Saif Ali Khan च्या प्रकृतीबद्दल सर्वांत मोठी अपडेट समोर!

Bigg Boss 17 | ‘तुला अंकितापेक्षा कोळशाच्या खाणीचा अहंकार…’; मिडियाने विकी जैनला सुनावलं