Shreyas Talpade | मराठी तथा बॉलिवूड अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) आताच एका मोठ्या संकटातून बाहेर पडला आहे. खरं तर त्याला दुसरा जन्मच मिळाला आहे. काही दिवसांपूर्वी ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटाचं शूट सुरु असताना अस्वस्थ वाटू लागल्याने तो घरी निघून गेला. मात्र रुग्णालयात पोहोचल्यावर त्याला हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आल्याचं म्हटलं गेलं. त्यामुळे तो बरेच दिवस रुग्णालयातच होता. या कठीण प्रसंगातून आता तो आणि त्याचं कुटुंब सावरलं आहे. यानंतर तो पुन्हा आपल्या कामावर लागला आहे. अशातच त्याने पोस्ट केलेला एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. यावर चाहत्यांच्यादेखील बऱ्याच प्रतिक्रिया उमटत आहेत. त्याचा हा व्हिडीओ बघून चाहते त्याला थेट ‘हा तर मराठी इंडस्ट्रीचा विजय थालापती’, म्हणत आहेत.
श्रेयस तळपदेचा व्हिडीओ तूफान व्हायरल
मराठी इंडस्ट्रीमध्ये सध्या ‘श्रीदेवी प्रसन्न’ हा चित्रपट चर्चेत आहे. यात अभिनेत्री सई ताम्हणकर आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. यातील पहिले गाणे नुकतेच रिलीज जाहीर झाले आहे. “दिल मैं बजी गिटार…” असे नाव असलेले हे गाणे ‘अपना सपना मनी मनी’ या हिंदी चित्रपटातील ‘गिटार साँग’चे मराठी व्हर्जन आहे. बॉलिवूडच्या या गाण्यात अभिनेता रितेश देशमुख व श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) मुख्य भुमिकेत होते. त्यामुळे या ‘गिटार साँग’च्या मराठी व्हर्जनमध्ये श्रेयसही दिसून आल्याने चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे. या गाण्याचा व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्याचा अंदाज बघून चाहते आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. श्रेयसने 18 वर्षांनी या गाण्याचा भाग होता आले याचा आनंद व्यक्त केला आहे.
श्रेयसच्या व्हिडीओवर चाहत्यांच्या प्रतिक्रिया
श्रेयसने (Shreyas Talpade) व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर क्षणात तो व्हायरल झाला. चाहत्यांना त्याचा अंदाज प्रचंड भावला आहे. एक चाहत्याने तर थेट म्हटले, ‘मराठी इंडस्ट्रीचा विजय थालापती आहेस तू श्रेयस’ यावर श्रेयसने ही प्रतिक्रिया दिली. “बापरे! मित्रा…धन्यवाद, तुझे खूप आभार पण, मी श्रेयस म्हणूनच ठिक आहे रे”, असे श्रेयस म्हणाला.
View this post on Instagram
‘श्रीदेवी प्रसन्न’ हा चित्रपट 2 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहेत. यामध्ये जय मोने, शुभांगी गोखले, समीर खांडेकर, रसिका सुनील, वंदना सरदेसाई, पूजा वानखडे, रमाकांत डायमा, जियांश पराडे यांच्या मुख्य भूमिका आहेत. मात्र, श्रेयसच्या अंदाजाचीच सध्या अधिक चर्चा होत आहे.
श्रेयसने सांगितला ‘तो’ किस्सा
आज मी (Shreyas Talpade) 18 वर्षांपूर्वी केलेल्या एका गाण्याला मी पहिल्यांदा कधी ऐकले याची रंजक गोष्ट सांगायला मला आवडेल.
हा माझा पहिला चित्रपट ‘इक्बाल’ रिलीज होण्याआधीचा किस्सा आहे. मला सुभाष घई यांनी अंधेरीतील अॅमेडियस स्टुडिओमध्ये काही कामासाठी बोलावले होते. आम्ही आमच्या कामाची चर्चा पूर्ण केल्यानंतर, सुभाषजी मला एका संगीत बैठकीच्या खोलीत घेऊन गेले जिथे प्रीतमदा एका गाण्यावर काम करत होते.
ज्या क्षणी आम्ही प्रवेश केला, त्या क्षणी त्यांनी सुभाषजींना उत्साहाने सांगितले की, त्यांनी एक गाणे तयार केले आहे आणि त्यांच्या गिटारवर ‘दिल में बजी गिटार’ वाजवायला सुरुवात केली. त्यावेळी मला ती धुन प्रचंड आवडली. सुभाषजींनी मला माझे मत विचारले.त्यावेळी मी म्हणालो होतो, ‘सर मला वाटते की ही एक सुपरहिट ट्यून आहे’. मला माहीत नव्हते की एका वर्षात मी त्याच गाण्याचा एक भाग होईन. पण आता मला माहित आहे की, नियतीने तुम्हाला तुमच्यासाठी असलेल्या गोष्टींशी जोडण्याचे कसे मनोरंजक मार्ग तयार केले. त्याच्या पुढच्याच वर्षी मी ‘अपना सपना मनी मनी’…अशा चित्रपटाचा भाग झालो जिथे मी निर्मात्यांची पहिली पसंती नव्हतो. तिथून एक अभिनेता बाहेर पडला आणि शेवटच्या क्षणी माझी निवड झाली. 18 वर्षांनंतर पुन्हा त्याच गाण्याचा एक छोटासा भाग असल्याबद्दल मला खूप आनंद आणि अभिमान वाटतो आहे.
News Title- Shreyas Talpade video goes viral
महत्वाच्या बातम्या-
3 लग्नं अन् एकाचवेळी 3 मोठ्या चुका! Shoaib Malik अडचणीत; चाहत्यांनी घेतली शाळा
Ram Mandir | किंग कोहलीचा ड्युप्लिकेट अयोध्येत! सेल्फी घेण्यासाठी उडाली झुंबड; Video ‘विराट’ Viral
Ram Mandir | विराट-रोहितची अनुपस्थिती! जड्डूची हजेरी; ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूचा भारताला ‘जय श्री राम’
Ayodhya Ram Mandir | अंबानी कुटुंबाकडून राम मंदिरासाठी कोट्यवधींचे दान; जाणून घ्या रक्कम