Kangana Ranaut | अयोध्येतून परतताच कंगना रनौतने केली मोठी घोषणा!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Kangana Ranaut | देशासाठी 22 जानेवारी हा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात अयोध्येमध्ये 500 वर्षांनी प्रभू श्री राम यांचे भव्य मंदिर निर्माण झालं आहे. या सोहळ्यासाठी देशातील दिग्गज व्यक्तींची उपस्थिती होती. यावेळी अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut ) देखील अयोध्येत हजर होती.

अयोध्येत कंगनाने बागेश्वर बाबांची भेट देखील घेतली. सोहळ्यानंतर मुंबईत परतताच तिने सर्वांत मोठी घोषणा केली आहे. कंगनाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट करत चाहत्यांना मोठी खुशखबर दिली आहे. तिने आपल्या आगामी चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली आहे. त्यामुळे चाहत्यांना आनंद झाला आहे.

कंगनाने केली मोठी घोषणा

कंगनाने (Kangana Ranaut ) इन्स्टाग्रामवर एक पोस्टर पोस्ट केलं आहे. तिचा आगामी चित्रपट ‘इमर्जन्सी’ याचे ते पोस्टर आहे. कंगनाने स्वतः इमर्जन्सी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. यात तिने मुख्य भूमिका साकारली आहे. “भारतातील सर्वात डार्क तासामागील कथा लवकरच भेटीला येतीये. 14 जून 2024 रोजी सिनेमाघरात घेऊन येतोय ‘इमर्जन्सी’ इतिहासातील सर्वांत निडर पंतप्रधान इंदिरा गांधी चित्रपटाद्वारे पुन्हा समोर येत आहेत.”, अशा आशयाची पोस्ट कंगनाने केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

“इमर्जन्सी हा माझा सर्वात महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. मणिकर्णिकानंतरचा हा सर्वांत मोठा प्रोजेक्ट आहे. यासाठी मोठे बजेट ठेवण्यात आले आहे. या चित्रपटासाठी अनेक प्रतिभावंत लोक एकत्र आले आहेत.”, असे कंगना मागे म्हणाली होती. हा चित्रपट खरे तर 24 नोव्हेंबर 2023 मध्येच रिलीज होणार होता. मात्र, काही कारणांनी तो पुढे ढकलण्यात आला होता. आता कंगनाने पुन्हा एकदा चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली आहे. त्यामुळे चाहत्यांना मोठे सरप्राइज मिळाले आहे.

कंगनाचा बहुप्रतीक्षित चित्रपट येणार चाहत्यांच्या भेटीला

‘इमर्जन्सी’ (Emergency) हा चित्रपट झी स्टुडिओ आणि ‘मणिकर्णिका’च्या निर्मात्यांनीच निर्माण केला आहे. या चित्रपटात कंगना (Kangana Ranaut ) व्यतिरिक्त अभिनेते अनुपम खेर, महिमा चौधरी, मिलिंद सोमण, श्रेयस तळपदे, विशाक नायर आणि दिवंगत सतीश कौशिक यांच्याही भूमिका आहेत.

रितेश शाह यांनी चित्रपटाची पटकथा आणि संवाद लिहिले आहेत. हा चित्रपट माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Former Prime Minister Indira Gandhi) यांच्या जीवनावर आधारित आहे. यात कंगनाने इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे. ‘भारताच्या इतिहासातील हा विलक्षण भाग मोठ्या पडद्यावर आणण्यासाठी मी उत्सुक आहे.’,असे कंगना म्हणाली आहे. त्यामुळे चाहत्यांना आता चित्रपटाच्या रिलीज डेटची प्रतिक्षा असेल.

News Title-  Kangana Ranaut Announced Emergency release date

महत्त्वाच्या बातम्या –

3 लग्नं अन् एकाचवेळी 3 मोठ्या चुका! Shoaib Malik अडचणीत; चाहत्यांनी घेतली शाळा

Ram Mandir | किंग कोहलीचा ड्युप्लिकेट अयोध्येत! सेल्फी घेण्यासाठी उडाली झुंबड; Video ‘विराट’ Viral

Ram Mandir | विराट-रोहितची अनुपस्थिती! जड्डूची हजेरी; ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूचा भारताला ‘जय श्री राम’

Ayodhya Ram Mandir | अंबानी कुटुंबाकडून राम मंदिरासाठी कोट्यवधींचे दान; जाणून घ्या रक्कम

Ram Mandir Ayodhya | देशभरात दीपोत्सव अन् रोषणाई; दिल्लीत परतताच मोदींची सर्वसामान्यांसाठी मोठी घोषणा