Uddhav Thackeray | “आमची सत्ता येऊ दे, तुमच्या तंगड्या तुमच्या गळ्यात घालतो की नाही बघा”

Uddhav Thackeray

नाशिक | उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) आज नाशिकमध्ये जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. घर माझ्या कार्यकर्त्याचं पाय ताणून बसतात हे नालायक लोकं. येऊ दे आमची सत्ता तुमच्या तंगड्या तुमच्या तंगड्या तुमच्या गळ्यात घालतो की नाही बघा, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला आणि भाजपला इशारा दिला आहे.

उद्धव ठाकरेंचा शिंदे आणि भाजपला इशारा

मिंधे मिंधे जे बोलतातना यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले. अरे मिंध्या तुझ्यासमोर महाराष्ट्र लुटला जातोय, तू शेपूट हलवत दिल्लीची चाकरी करत आहे. शेपूट हलवत बसतोय खुर्चीसाठी. हे बाळासाहेबांचे विचार? हे बाळासाहेबांचं हिंदुत्व?, असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी शिंदेंवर टीकास्त्र सोडलंय.

Uddhav Thackeray | “त्या नार्वेकर लबाडाला सांगा…”

मी आहे ते पद सोडायला तयार आहे, जसं मुख्यमंत्रीपद सोडलं. जा त्या नार्वेकरला सांगा, लबाडाला सांगा, हिंमत असेल तर इकडे येऊन बोल मी तुझ्याबरोबर येतो. सांग शिवसेना कुणाची, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान कोकणात गेले. सिंधुदुर्गात. नौदल दिन होता. बरं वाटलं. बळेबळे शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला. लोकांना वाटलं काही तरी कोकणासाठी देईल. पण कसलं काय. तिकडे गेले, अन् पाणबुडी प्रकल्प पळवला. क्रिकेटची मॅचही तिकडे गेली. नाही तर आपण जिंकलो असतो, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

आता तर मधल्या काळात हेच लोकं बोंबलून ओरडत होती ना बॉयकॉट बॉलिवूड. काल बॉलिवूडच होते. शंकराचार्य नाही. हे यांचं थोतांड. आता फिल्मफेअरचा सोहळाही गुजरातला घेऊन जात आहे. महसूल मिळण्याची ठिकाणं गुजरातला नेत आहे. महाराष्ट्राने असं काय पाप केलंय की आमच्या मुळावर येत आहात, असंही ठाकरेंनी म्हटलंय.

आम्हाला हिंदुत्व शिकवणाऱ्यांनी आधी आपली जन्म कुंडली मांडावी. आजची ही परिस्थिती पाहिल्यावर मलाही थोडा पश्चात्ताप होतोय. त्यावेळी केवळ हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ते आणि आपण एकत्र आलो. पण हे लोक भगव्यात भेद करणारे निघाले. त्यांनी विचारांची वाताहत केली आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

महत्त्वाच्या बातम्या- 

Private Jets | ‘इच्छा नसतानाही…’; एअर होस्टेसचा अत्यंत धक्कादायक खुलासा

Saif Ali Khan च्या प्रकृतीबाबत सर्वात मोठी माहिती समोर!

‘पाकिस्तानी क्रिकेटपटूंची पत्नीविषयी आवड म्हणजे…’; Sania Mirza ने केला मोठा खुलासा

Apple Side Effects | या सीजनमध्ये तुम्हीही रोज सफरचंद खाताय?; मग हे वाचाच, आताच व्हा सावध!

स्पोर्टी लूक, जबरदस्त मायलेज, हीरोची ‘Xtream 125R’ बाईक लाँच, जाणून घ्या किंमत

Join WhatsApp

Join Now

संबंधित बातम्या

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .