Nita Ambani वापरतात ‘या’ बड्या कंपनीचा फोन; किंमत लाखोच्या घरात, अयोध्येत दिसली झलक

Nita Ambani | सोमवारी अयोध्येतील भव्य राम मंदिराचे उद्घाटन पार पडले. विविध क्षेत्रातील दिग्गजांच्या उपस्थिती रामललाचा अभिषेक सोहळा पार पडला. या कार्यक्रमासाठी काही सेलिब्रिटी आणि उद्योगपती त्यांच्या कुटुंबियांसोबत दिसले. यादरम्यान अंबानी कुटुंबीय देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. नीता अंबानी या सोहळ्याला पोहोचल्या, तिथे त्यांच्या हातात एक अप्रतिम फोन दिसला, ज्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे. 22 जानेवारीला अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने नीता अंबानी आपल्या संपूर्ण कुटुंबासह पोहोचल्या होत्या.

नीता अंबानी यांच्या हातात असलेल्या नव्या कोऱ्या फोनने सर्वांचे लक्ष वेधले. नीता अंबानी कोणता फोन वापरतात हे जाणून घेण्याची उत्सुकता लोकांमध्ये दिसली. खरं तर नीता अंबानींच्या हातात दिसणारा फोन हा iPhone 15 Pro सीरीजचा हँडसेट आहे, तो लेटेस्ट लाइनअप आहे. (iPhone 15 Pro Max in Nita Ambani hand) या कंपनीने मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात हा फोन लॉन्च केला होता.

अयोध्येत दिसली झलक

आयफोन 15 Pro लॉन्च होताच ग्राहकांची झुंबड उडाली होती. पण या फोनची किंमत सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. नीता अंबानींच्या हातात दिसलेल्या फोनमध्ये तीन कॅमेरे आहेत आणि त्याची रचना पाहता हा iPhone 15 Pro सीरीजचा एक भाग असल्याचे स्पष्ट होते. नीता अंबानी यांच्या फोनची झलक अयोध्येत दिसली, जेव्हा त्या रामललाच्या अभिषेक सोहळ्यासाठी उपस्थित राहिल्या.

आयफोन 15 प्रो सीरीजमध्ये दोन हँडसेट रिलीज करण्यात आले, त्यापैकी एक आयफोन 15 प्रो आणि दुसरा आयफोन 15 प्रो MAX आहे. दोन्ही मोबाईच्या आकारात खूप फरक आहे, नीता अंबानींच्या हातात दिसणारा हँडसेट iPhone 15 Pro Max असल्याचे दिसते. पण, दोन्हीही हँडसेटनी ग्राहकांना भुरळ घालण्यात यश मिळवले.

Nita Ambani यांच्या फोनची किंमत लाखोच्या घरात

दरम्यान, iPhone 15 Pro Max ची सुरुवातीची किंमत 159900 रुपये ठेवण्यात आली आहे, ज्यामध्ये 256 GB पर्यंत स्टोरेज देण्यात आले आहे. या व्यतिरिक्त 512 GB स्टोरेज असलेल्या हँडसेटची किंमत 179900 रुपये आहे. iPhone 15 Pro Max मध्ये 6.7 इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले देखील आहे. एकूणच नीता अंबानींच्या फोनची किंमत 179900 रुपये आहे.

iPhone 15 Pro Camera

iPhone 15 Pro Max मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यामध्ये कॅमेरा 48 मेगापिक्सलचा आहे, तर यात 12 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देखील उपलब्ध आहे. विविध वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असलेला हा फोन ग्राहकांच्या पसंतीस उतरला. नामांकित मंडळीकडे बऱ्याचदा हा फोन पाहायला मिळतो.

News Title- Nita Ambani is using iPhone 15 Pro Max which is priced at Rs 179900.
 महत्त्वाच्या बातम्या –

Kangana Ranaut | अयोध्येतून परतताच कंगना रनौतने केली मोठी घोषणा!

Uddhav Thackeray | “आमची सत्ता येऊ दे, तुमच्या तंगड्या तुमच्या गळ्यात घालतो की नाही बघा”

Private Jets | ‘इच्छा नसतानाही…’; एअर होस्टेसचा अत्यंत धक्कादायक खुलासा

Saif Ali Khan च्या प्रकृतीबाबत सर्वात मोठी माहिती समोर!

‘पाकिस्तानी क्रिकेटपटूंची पत्नीविषयी आवड म्हणजे…’; Sania Mirza ने केला मोठा खुलासा